पोस्ट्स

"अगा जे घडलेचि नाही........!"

इमेज
परळीतील 'त्या' आपहरण प्रकरणी 'नवा ट्विस्ट' आला समोर ! 'किडनॅपिंग नव्हे  कोम्बिंग ऑपरेशन': किडनॅपर नव्हे ते निघाले पोलीस ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      गेल्या अकरा दिवसांपूर्वी परळीच्या मुख्य रस्त्यावरून सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास एका इसमाला चार ते पाच लोकांनी पांढऱ्या इनोव्हा गाडीत उचलून घेऊन गेल्याचा प्रकार पुढे आला होता. याप्रकरणी अपहरण करण्यात आल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला. परळी पोलिसांनी याचा युद्धपातळीवर तपास केला. यातून या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. ते किडनॅपिंग नाही तर पोलीसांचे कोम्बिंग ऑपरेशन होते हे आता स्पष्ट झाले आहे.       राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक ते गणेशपार रोड या मुख्य रस्त्यावरील एका हाँटेल जवळून दि. 06/05/ 2025 रोजी सायंकाळी 5.45 वाजण्याचे सुमारास पिडीत इसम नामें शेख अमजेद अहमद शेख वय 35 वर्ष रा. बरकत नगर परळी वै यास अनोळखी पाच ते सहा लोकांनी पकडुन रोडवर उभ्या केलेल्या पांढर्‍या रंगाच्या ईन्व्हा गाडी मध्ये बळजबरीणे टाकुन घेवुन गेले अशी फिर्याद देण्यात आली.  यावरुन पो.स्टे.संभाजीनगर परळी वै. येथे तात्काळ ...
इमेज
सिमेंट रस्त्यांवर डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न -ॲड. जीवनराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलनाची चेतावणी परळी (प्रतिनिधी)   परळी शहरात नगरपालिकेच्या वतीने सिमेंट रस्त्यांवरील खड्डे डांबर टाकून बुजवण्याचा प्रकार सुरू असून, यामागे केवळ पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील रस्त्यांची डागडुजी दाखवून मलिदा लाटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे करण्यात आला आहे. शहरात तीर्थक्षेत्र विकास, नगरोत्थान योजना आणि विविध योजनांतून कोट्यवधी रुपये आले असतानाही रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. विशेष म्हणजे, सिमेंट रस्त्यांवर डांबर टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून, हे केवळ पालकमंत्र्यांसमोर शहराची प्रतिमा चांगली भासावी म्हणून केले जात आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्यांवरील डांबर स्पॅचिंगसाठी बिल काढून पुन्हा आर्थिक बोजा टाकण्याची तयारी सुरू असल्याचा आरोपही या पक्षाकडून करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष अ‍ॅड. जीवन देशमुख यांनी मागणी केली आहे की, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी सदरील प्रकाराची गंभीर दखल घ्यावी. ...
इमेज
  शिवराज दिवटे अमानुष मारहाण प्रकरण: पिडिताचा नोॅदवला जबाब, वीस आरोपींवर गुन्हा;सात जण ताब्यात परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        तालुक्यातील टोकवाडी परिसरामध्ये काल शिवराज दिवटे या युवकाला अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. या महाराणीचे व्हिडिओ व फोटो संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्यानंतर जखमी झालेल्या शिवराज दिवटे या युवकावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरम्यान पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला असुन या प्रकरणात दहा नावे व दहा अनोळखी अशा 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सात आरोपी ताब्यात घेतले आहेत अन्य आरोपीचा तपास सुरू आहे दरम्यान या प्रकरणात जातीय रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.     याबाबत शिवराज दिवटे याने दिलेल्या जबाब म्हटले आहे की,  "दि 16/05/2025 रोजी सकाळी 11.30 वा चे सुमारास जलालपुर येथे हनुमान मंदिरात पाहुण्याचा सप्ताहाचा कार्यक्रम असल्याने माझ्या सोबत जयदीप मुंडे असे आम्ही गेलो होतो, जेवण करत असतांना तेथे ...
इमेज
  जनसेवेचे वैद्यकीय रूप – डॉ. विवेक दंडे परळी वैजनाथ – श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली ही परळी वैद्यनाथ नगरी आरोग्यसेवेसाठीही ओळखली जाते, आणि त्या ओळखीला समर्पितपणे आकार देणारे नाव म्हणजे डॉ. विवेक दंडे. डॉक्टर हा पेशा व्यवसायापेक्षा अधिक समाजसेवेचा आहे, हे त्यांनी आपल्या कामातून वेळोवेळी सिद्ध केले आहे. आज 17 मे रोजी डॉ. विवेक दंडे यांचा वाढदिवस असून, या विशेष दिनानिमित्ताने त्यांचे समाजकार्य, वैद्यकीय योगदान आणि सामाजिक बांधिलकी यांचा घेतलेला हा सन्मानार्थ लेख आहे. डॉ. विवेक दंडे यांना वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाली. स्वर्गीय डॉ. दिगंबर दंडे (दादा) हे परळीतील ज्येष्ठ आणि आदरणीय डॉक्टर होते. त्यांनी केवळ औषधोपचार नव्हे, तर माणुसकीची सेवा केली. तोच आदर्श डॉ. विवेक दंडे यांनी आत्मसात केला. आज त्यांच्या रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण केवळ उपचारच नव्हे, तर मायेचा स्पर्श अनुभवतो. दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे संचालक म्हणून ते आर्थिक क्षेत्रातही सामाजिक भान जपत कार्यरत आहेत. सामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य देणारी त्यांची भूमिका आज बँकिंग क्षेत्रातही आदर्श ...
इमेज
परळीत अवैध पिस्तूल बाळगणारे दोन आरोपी जेरबंद :दोन विक्रेत्यांवरही गुन्हा, त्यांचा शोध सुरु बीड, प्रतिनिधी....               जिल्हयातील अवैध व्यवसायांच्या विरुध्द करण्यात येणाऱ्या कारवायांचा एक भाग म्हणून अवैध शस्त्रे बाळगणा-यांविरुध्द पोलीस अधिक्षक  नवनीत काँवत यांनी मोहिम उघडलेली आहे. त्यानुसार सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित करुन बीड जिल्हयात कोणत्याही प्रकारे अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही याची खबरदारी घेऊन जे कोणी अवैध शस्त्रे बाळगतील अशांविरुध्द कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे.            त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांना गोपनिय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, परळी वैजनाथ येथील रेल्वे स्टेशन परीसरात दोन इसम येत असून त्यांच्याजवळ अवैध गावठी कट्टा आहे. या माहितीच्या आधारे दि. १६ मे रोजी सकाळी परळी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लाऊन दोन इसम नामे अमोल रा...

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

इमेज
Video Viral: परळीत युवकाला बेदम मारहाण; आठ ते दहा जण मारतायत अन् 'तो' जीवाच्या अकांताने विव्हळतोय! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळीत एका टोळक्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ८ ते १० जणांनी मिळून एका तरुणाचं अपहरण केलं आणि जंगलामध्ये नेऊन अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.              टोकवाडी परिसरात अमानुष मारहाण केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ८ ते १० युवक लाकडी काठी,  बेल्टने एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करत आहेत. हा तरुण वेदनांनी विव्हळत आहे, पण एक एक करून हे तरुण त्याला लाथा बुक्याने मारहाण करत आहेत. यात एक तरुण हा मारहाण करताना चित्रीकरण देखील करत असल्याचं दिसून येत आहे. मारहाण झालेला तरुण लिंबोटा येथील शिवराज दिवटे असल्याचं समोर आलं आहे.या घटनेने सर्वत्र चर्चेला उधाण आले असुन या प्रकरणी अद्याप पोलीसात नोंद झालेली नाही.या मारहाण प्रकरणात गंभीर जखमी युवकाला परळीतील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवि...
इमेज
  परळीतील पवित्र घनशी आणि सरस्वती नद्यांचे संरक्षण व संवर्धन करा ! माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेऊन सादर केले निवेदन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग स्थान परळी वैजनाथ येथील पवित्र घनशी आणि सरस्वती नद्यांची स्वच्छता, अतिक्रमणमुक्त करुन संवर्धन करा अशा महत्वपूर्ण मागणीसाठी माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.          केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांची आज परळीचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन परळीचा महत्वपूर्ण प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील परळी वैद्यनाथ जिल्हा बीड येथे असलेले श्री प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे पाचवे ज्योतिर्लिंग हे अत्यंत महत्त्वाचे आणि लक्षणीय स्थान आहे. या शहराला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे, शहराजवळून पवित्र नदी घनशी आणि सरस्वती नदी वाहतात. त्याची स्थिती घाणीने, अतिक्रमण केलेल्या जागेमुळे बिघडली आहे,...