"अगा जे घडलेचि नाही........!"

परळीतील 'त्या' आपहरण प्रकरणी 'नवा ट्विस्ट' आला समोर !

'किडनॅपिंग नव्हे  कोम्बिंग ऑपरेशन': किडनॅपर नव्हे ते निघाले पोलीस !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     गेल्या अकरा दिवसांपूर्वी परळीच्या मुख्य रस्त्यावरून सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास एका इसमाला चार ते पाच लोकांनी पांढऱ्या इनोव्हा गाडीत उचलून घेऊन गेल्याचा प्रकार पुढे आला होता. याप्रकरणी अपहरण करण्यात आल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला. परळी पोलिसांनी याचा युद्धपातळीवर तपास केला. यातून या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. ते किडनॅपिंग नाही तर पोलीसांचे कोम्बिंग ऑपरेशन होते हे आता स्पष्ट झाले आहे.

      राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक ते गणेशपार रोड या मुख्य रस्त्यावरील एका हाँटेल जवळून दि. 06/05/ 2025 रोजी सायंकाळी 5.45 वाजण्याचे सुमारास पिडीत इसम नामें शेख अमजेद अहमद शेख वय 35 वर्ष रा. बरकत नगर परळी वै यास अनोळखी पाच ते सहा लोकांनी पकडुन रोडवर उभ्या केलेल्या पांढर्‍या रंगाच्या ईन्व्हा गाडी मध्ये बळजबरीणे टाकुन घेवुन गेले अशी फिर्याद देण्यात आली.  यावरुन पो.स्टे.संभाजीनगर परळी वै. येथे तात्काळ गुन्ह्याची नोंदही करण्यात आली. मात्र प्रथमदर्शनी या इसमाची पार्श्वभूमी तपासली असता त्याचे आपहरण व्हावे या पातळीचे कोणतेच ठोस कारण पुढे आलेले नव्हते. पिडीत इसम हा टेलरकाम करणारा असल्याची माहिती मिळाली. कारागिर म्हणून टेलरिंगची कामे तो करतो.त्यामुळे या अपहरणाचे कारण शोधणे उत्सुकतेचे ठरले होते. मात्र आपहरण करण्यासाठीच्या जवळपास सर्वच पैलूंची पडताळणी पोलीसांनी केली असता ठोस मुद्दा समोर आलेलाच नाही. त्यामुळे आता खरोखरच हे अपहरण झाले की अन्य काही प्रशासकीय  तपास, पोलीस प्रक्रिया आदी कारणांसाठी घेऊन गेले असे तर्क वर्तवण्यात येत होते.पोलीस दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्व बाबींची पडताळणी करत होते. या तपासादरम्यान नविनच ट्विस्ट समोर आला आणि हे मुळात आपहरण नव्हतेच तर ही पोलीस कारवाई होती हे समोर आले आहे.


'किडनॅपिंग नव्हे  कोम्बिंग ऑपरेशन': किडनॅपर नव्हे ते निघाले पोलीस !

      या प्रकरणाचा पोलीस तपासातून नवीनच उलगडा झाला असुन ज्या व्यक्तीचे परळीतून आपहरण झाले अशी फिर्याद पोलीस ठाण्यात देण्यात आली होती वास्तविक ते आपहरण नव्हते तर तेलंगणा पोलीसांचे तपास पथक होते.एका गंभीर गुन्ह्यात संबंधित इसमाचे  नाव उलगडले होते.त्याचा शोध घेत तेलंगणा पोलीसांनी धडक कारवाई करत त्याला आहे त्या स्थळावरुन आहे त्या स्थितीत ताब्यात घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे.याबाबत परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा अंतिम छडा लावण्याची कामगिरी बजावली असुन हे प्रकरण सर्व तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करीत न्यायालयापर्यंत पोहविण्यापर्यंतची जलदगती कारवाई पूर्ण केली आहे.

तेलंगणातील काय आहे नेमकं प्रकरण?

      तेलंगणामधील कुकटपल्ली कॉलेजमधील दोन विद्यार्थ्यांना शहरात २.७ किलो गांजा वाहतूक करताना अटक करण्यात आली होती. महाराष्ट्रातील परळी येथून हैदराबादला ९१,००० रु. किमतीचा २.७ किलो गांजा वाहतूक करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना बालानगर स्पेशल ऑपरेशन्स टीम (SOT) ने मियापूरमधील हाफिजपेट रेल्वे स्टेशनवर अटक केली. २० वर्षीय पतिबाला वेंकट सत्यनरसिंह स्वामी आणि २३ वर्षीय गद्दी दीपक अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही कुकटपल्ली येथील सिद्धार्थ डिग्री आणि पीजी कॉलेजचे विद्यार्थी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी परळी येथील गांजा पुरवठादार एमडी अमजदकडून हा अवैध पदार्थ खरेदी केला होता आणि तो ट्रेनने हैदराबादला पोहोचवला होता.मियापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अमजद आणि ड्रग्ज पुरवठा नेटवर्कमधील पुढील संबंधांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले.या अनुषंगानेच परळीतील अमजद यास तेलंगणा पोलीसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून ताब्यात घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार