इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 परळीतील पवित्र घनशी आणि सरस्वती नद्यांचे संरक्षण व संवर्धन करा !

माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेऊन सादर केले निवेदन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग स्थान परळी वैजनाथ येथील पवित्र घनशी आणि सरस्वती नद्यांची स्वच्छता, अतिक्रमणमुक्त करुन संवर्धन करा अशा महत्वपूर्ण मागणीसाठी माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

         केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांची आज परळीचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन परळीचा महत्वपूर्ण प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील परळी वैद्यनाथ जिल्हा बीड येथे असलेले श्री प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे पाचवे ज्योतिर्लिंग हे अत्यंत महत्त्वाचे आणि लक्षणीय स्थान आहे. या शहराला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे, शहराजवळून पवित्र नदी घनशी आणि सरस्वती नदी वाहतात. त्याची स्थिती घाणीने, अतिक्रमण केलेल्या जागेमुळे बिघडली आहे, ती अपवित्र केली जात आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून पवित्र सरस्वती नदीचे जतन करणे खूप महत्वाचे आहे. येथील स्थानिक प्रशासनाने नदीचे नाल्यात रूपांतर केले आहे आणि याअंतर्गत सरस्वती नदी नामशेष करण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. या पवित्र नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी, पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी, नद्यांचे संवर्धन आणि पुनर्संचयनाला चालना देण्यासाठी, हे उद्दिष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारमार्फत या पवित्र नद्यांच्या संवर्धन आणि संवर्धनासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा आणि या पवित्र स्थानाचे जतन करावे अशी  परळीतील नागरिक आणि शिवभक्तांची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.

       याबाबत प्राधान्याने लक्ष घालून हा महत्वपूर्ण व जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांनी दिले असल्याचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या