इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

सिमेंट रस्त्यांवर डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न -ॲड. जीवनराव देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलनाची चेतावणी

परळी (प्रतिनिधी) 

 परळी शहरात नगरपालिकेच्या वतीने सिमेंट रस्त्यांवरील खड्डे डांबर टाकून बुजवण्याचा प्रकार सुरू असून, यामागे केवळ पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील रस्त्यांची डागडुजी दाखवून मलिदा लाटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे करण्यात आला आहे.

शहरात तीर्थक्षेत्र विकास, नगरोत्थान योजना आणि विविध योजनांतून कोट्यवधी रुपये आले असतानाही रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. विशेष म्हणजे, सिमेंट रस्त्यांवर डांबर टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून, हे केवळ पालकमंत्र्यांसमोर शहराची प्रतिमा चांगली भासावी म्हणून केले जात आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्यांवरील डांबर स्पॅचिंगसाठी बिल काढून पुन्हा आर्थिक बोजा टाकण्याची तयारी सुरू असल्याचा आरोपही या पक्षाकडून करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष अ‍ॅड. जीवन देशमुख यांनी मागणी केली आहे की, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी सदरील प्रकाराची गंभीर दखल घ्यावी. सिमेंट रस्त्यावर डांबर टाकण्याचे कोणतेही बिल मंजूर करू नये. तसेच रस्त्यांच्या दुरवस्थेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी आणि त्यांच्याकडून झालेल्या आर्थिक नुकसानीची वसुली करून दंड आकारावा.

या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) परळी शहरात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही अ‍ॅड. जीवन देशमुख यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या