गोपीनाथगडावर 'नो प्लास्टिक' : पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडेंची स्वत:पासून सुरुवात!

लोकनेते मुंडे साहेबांच्या अभिवादनासाठी आज गोपीनाथगडावर उसळणार अलोट गर्दी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, पशूसंवर्धन कॅम्प, वृक्षरोपांचे वाटप यासह विविध उपक्रमांचे आयोजन रामायणाचार्य ढोक महाराजांचे सुश्राव्य कीर्तन परळी वैजनाथ । दिनांक ०२। आपल्या लाडक्या लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी उद्या ३ जून रोजी गोपीनाथ गडावर राज्यभरातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळणार आहे.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त ३ जून रोजी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असून ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य कीर्तनाचा सर्वांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. गोपीनाथगड येथे स्मृतीदिनाची जय्यत तयारी झाली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर अफाट प्रेम करणारे राज्यभरातील असंख्य मुंडेप्रेमी यादिवशी गोपीनाथगड येथे नतमस्तक होऊन आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करणार आहेत.राज्याच्या पर्यावरण आणि पशूसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. प्र...