पोस्ट्स

गोपीनाथगडावर 'नो प्लास्टिक' : पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडेंची स्वत:पासून सुरुवात!

इमेज
  लोकनेते मुंडे साहेबांच्या अभिवादनासाठी आज गोपीनाथगडावर उसळणार अलोट गर्दी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, पशूसंवर्धन कॅम्प, वृक्षरोपांचे वाटप यासह विविध उपक्रमांचे आयोजन रामायणाचार्य ढोक महाराजांचे  सुश्राव्य कीर्तन परळी वैजनाथ । दिनांक ०२। आपल्या लाडक्या लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी उद्या ३ जून रोजी गोपीनाथ गडावर राज्यभरातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळणार आहे.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त ३ जून रोजी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असून  ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य कीर्तनाचा सर्वांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.  गोपीनाथगड येथे स्मृतीदिनाची जय्यत तयारी झाली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर अफाट प्रेम करणारे राज्यभरातील असंख्य मुंडेप्रेमी यादिवशी गोपीनाथगड येथे नतमस्तक होऊन आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करणार आहेत.राज्याच्या पर्यावरण आणि पशूसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. प्र...

जिजाभाऊंचे अकाली निधन ही कधीही न भरून निघणारी हानी, धनंजय मुंडे भावूक

इमेज
  स्व. आर. टी.  देशमुख यांच्या कुटुंबीयांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन जिजाभाऊंचे अकाली निधन ही कधीही न भरून निघणारी हानी, धनंजय मुंडे भावूक परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज माजी आमदार तथा भाजपचे नेते स्वर्गीय आर. टी. जिजा देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या स्मृतिस आदरांजली अर्पण करत देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले.  स्व. आर. टी. देशमुख यांचे एका कार अपघातात लातूर जिल्ह्यातून परतत असताना दुर्दैवी निधन झाले होते. मात्र त्यावेळी धनंजय मुंडे हे विपश्यना केंद्रात असल्याने अंत्यविधिस उपस्थित नव्हते.  धनंजय मुंडे यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली तेव्हा ते चांगलेच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आर. टी. देशमुख हे स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब तसेच स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या सोबत अगदी तळागाळात काम केलेले एक सच्चे सहकारी म्हणून सुपरिचित होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना मुंडेसह देशमुख कुटुंबीय सुध्दा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.        जीजांचे अकाली निधन ही देशमुख कुटुंबाइतकीच मुंडे कुटुंबाची सुद्...

ना.पंकजा मुंडेंनी दिलं सर्वांना निमंत्रण

इमेज
  गोपीनाथगडावरील आजचा कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा  ना.पंकजा मुंडेंनी दिलं सर्वांना निमंत्रण  परळी वैजनाथ,।दिनांक ०२।  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पुण्यतिथी दिन म्हणजेच तीन जून हा गोपीनाथ मुंडे परिवाराचा पारिवारिक कार्यक्रमासून हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे.कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले असुन सर्वांनी उपस्थित राहावे असे निमंत्रण ना. पंकजा मुंडे यांनी दिले आहे.        याबाबत ना. पंकजा मुंडे यांनी एका व्हिडिओद्वारे सर्व मुंडे प्रेमींना आवाहन केले आहे. 3 जून हा दिवस उजडूच नये असे आपल्या सर्वांनाच वाटते. मात्र गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारावर मार्गक्रमण करून प्रेरणा व ऊर्जा घेण्यासाठी तीन जूनला आपण सर्वजण मोठ्या संख्येने गोपीनाथ गडावर येत असता. त्या दृष्टिकोनातून यावर्षीही तीन जून रोजी पारंपरिक पद्धतीने हा पुण्यतिथी दिन साजरा केला जाणार आहे. रामायणाचार्य ह.भ.प रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन व महाप्रसाद असा हा गोपीनाथ मुंडे परिवाराचा पारिवारिक कार्यक्रम आहे.तरी सर्वांनी तीन जून रोजी सकाळी 11 वाजता गो...

आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेत भामट्यांनी केली फसवणूक

इमेज
अंबाजोगाईतील सेवानिवृत्त शिक्षिकेला ‘डिजिटल अरेस्ट’ करून सायबर भामट्यांनी लुटले तब्बल ८३ लाख रुपये अंबाजोगाई : मी महाराष्ट्र पोलिस बोलत असून तुमच्या नावाने मनी लॉन्ड्रींग आणि अतिरेक्यांना फंडींग झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आम्हाला सहकार्य करा असे म्हणत व्हाट्सअपला व्हिडीओ कॉल करून निवृत्त शिक्षिकेला डीजिटल अरेस्ट केली. त्यानंतर २१ ते २९ मे या दरम्यान तब्बल ८३ लाख रूपये ऑनलाईन हडप केले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अंबाजोगाई जि.बीड) या निवृत्त शिक्षिका आहेत. २० मे रोजी त्यांच्या ना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. मी महाराष्ट्र पोलीस संजय पिसे बोलतो असे त्याने सांगितले. नंतर हिंदी भाषेत तो म्हणाला की तुमच्या आधारकार्डवरुन दुसरे सिमकार्ड १६ एप्रिल रोजी घेतले गेले आहे. या सीमकार्डच्या माध्यमातून तुमच्या नावाने मनी लॉन्ड्रीग व अतिरेक्यांना फंडींग झाली आहे. तुम्ही तीन दिवसात सर्व सहकार्य करा आणि आम्ही तुम्हाला यातुन सोडवु. यासाठी आम्ही विश्वास नांगरे पाटील साहेब यांना स्पेशली विनंती केल्याचा विश्वास दिला. आरोपींनी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल द्वारे मुंबई पोलिसांचे ऑफिस,...

ढिसाळ कारभार: वाहतूक चालू की बंद :प्रशासनाने केला संभ्रम तयार!

इमेज
आवमेळ: उड्डाणपुलावरील वाहतूक: रात्री १२.३० वा बॅरिकेटिंग लावून वाहतूक बंद केली रात्री १.३० वा.बॅरिकेटिंग काढून सुरु केली! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती चे काम करण्यासाठी आज मध्यरात्रीपासून उड्डाणपूलावरून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.याबाबत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांनी अधिकृतपणे सांगितले असुन प्रशासकीय नियोजन पुर्ण झालेले आहे त्यामुळे ५जुलैपर्यत वाहतूक बंद ठेवून तातडीने उड्डाणपूल दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या अनुषंगाने मध्यरात्री १२ वाजल्यानंतर वाहतूक बंद करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात बॅरिकेटिंग, सुचना फलक आदी करण्यात आले.मात्र रात्री १.३० वा. ज्यांनी लावले त्बॅयांनीच बॅरिकेटिंग काढले! असा प्रकार घडला.यामुळे प्रशासकीय ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोो आला.तसेच वाहतूक चालू की बंद?  असा प्रशासनाने मोठा संभ्रम तयार केला.    गेल्या वीस वर्षांत एकदाही डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल दुरावस्थेकडे बघण्यात आले नाही ही वस्तुस्थिती आहे. गेल्या अनेक महिन्यां...

प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख...

इमेज
  अष्टपैलू बडे नाना: एक माणुसकीचं झाड   ज्यांनी आपल्या अष्टपैलू प्रतिभेने आणि निरपेक्ष वृत्तीने अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले आहेत असे व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ(नाना)बडे. नाना हे केवळ एक नाव नाही, तर ते उत्तम शिक्षक, उपक्रमशील केंद्रप्रमुख, तरल कवी, भावस्पर्शी कथाकार, हरहुन्नरी कलावंत, एक चांगला माणूस, कुशल संघटक, पक्षीमित्र, आदर्श पिता, पती, पुत्र, सासरा, आजोबा, बंधू, सुहृदयी मित्र आणि खऱ्या अर्थाने माणुसकीचं झाड आहेत. त्यांच्या या विविध भूमिकांमधून त्यांनी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांवर आपला अमिट ठसा उमटवला आहे. *प्रतिभावंत ग्रामीण साहित्यिक:* महाराष्ट्राला ठाऊक असलेलं नाव नागनाथ बडे, हे नाव महाराष्ट्राला प्रतिभावंत ग्रामीण साहित्यिक म्हणून परिचित आहे. मराठवाड्यात नवसाहित्यिकांची एक मोठी पिढी ज्यांच्यामुळे उभी राहिली, त्यात नानांचं नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या लेखनात एक सोज्जवळ व सात्विक वृत्तीचा अभ्यासक दडलेला दिसतो. समाजातील आपला भवताल सुखी, समृद्ध आणि समाधानी रहावा यासाठी नाना नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. आपल्या स्नेह्यांना सर्व प्रकारची ...

उड्डाणपूल दुरुस्तीही अत्यंत गरजेची...!

इमेज
प्रशासकीय नियोजन पुर्ण: मध्यरात्री १२ वा.पासुन ५ जुलैपर्यंत उड्डाणपूलावरून वाहतूक राहणार बंद ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती चे काम  करण्यासाठी आज मध्यरात्रीपासून उड्डाणपूलावरून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.याबाबत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांनी अधिकृतपणे सांगितले असुन प्रशासकीय नियोजन पुर्ण झालेले आहे त्यामुळे ५जुलैपर्यत वाहतूक बंद ठेवून तातडीने उड्डाणपूल दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.     डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जारी केली होती.त्यानुसार काम सुरु होणार आहे. याबाबत उपविभागीय अभियंता, रा. म. उपविभाग लातूर यांनी संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने परळी वैजनाथ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब वरील डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाची तांत्रिक दुरावस्था लक्षात घेता त्या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. दुरुस्तीच्या कामास ...