पोस्ट्स

नशेच्या आहारी युवक: पुन्हा एकदा मुद्दा ऐरणीवर...

इमेज
नातवाकडून सत्तूरने आजीवर जीवघेणा हल्ला; मायबापांनाही केलं गंभीर जखमी नशेच्या आहारी गेलेल्या  वीस वर्षीय युवकाचे कृत्य परळी वैजनाथ ,प्रतिनिधी : परळी शहरातील तलाब कट्टा (फुलेनगर) परिसरात आज (दि.९) सायंकाळी ६.३०वा. सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने पैशासाठी आजीवर जीवघेणा हल्ला केला. तर त्याला रोखण्यासाठी आलेले आई-वडीलसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोर नातवाला संभाजीनगर पोलीसांनी शिताफिने ताब्यात घेतले आहे.             ही हृदयद्रावक घटना तलाब कट्टा (फुलेनगर) परिसरातील कुरेशी कुटुंबात घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुबेदा इब्राहिम कुरेशी या ८० वर्षीय वृद्धा घरी  होत्या. त्यांचा नातू आरबाज रमजान कुरेशी(वय २० वर्षे) हा नशेच्या अवस्थेत घरी आला आणि आजीकडे पैशाची मागणी करू लागला. आजीने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या आरबाजने हातातील सत्तूरने थेट त्यांच्या तोंडावर वार केला. या भयंकर हल्ल्यात आजीची मरणासन्न अवस्था झाली आहे.त्याची आई समिना रमजान कुरेशी व वडील रमजान  इब्राहिम कुरेशी तातडीने  धाव...

Public appeal:Prakash Joshi...

इमेज
लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचा ऐतिहासिक विजय निश्चित- प्रकाश जोशी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणुकीत राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालील लोकनेते लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचा विजय निश्चित असुन मतदारांनी भुलथापांना बळी न पडता लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनाच मतदान करावे असे आवाहन पॅनलचे उमेदवार प्रकाश जोशी यांनी केले आहे.      राज्यातील अतिशय विश्वासहर्ता प्राप्त  असलेल्या वैद्यनाथ बँक निवडणूकित विरोधकांनी विरोधाला विरोध म्हणून केविलवाणा प्रयत्न सुरू केले आहेत. पण जनतेला सर्व बाबी ओळखून असल्याने, लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल च्या सर्वच उमेदवारांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे आणि याअगोदर चार संचालक बिनविरोध निवडून आले असल्याने, विरोधकांचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होऊन सर्वच उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे. भविष्यात विरोधाला विरोध ही प्रवृती नामशेष करण्यासाठी, सर्वंच सभासदांनी भ...

Public appeal:Nilkanth Chate

इमेज
वैद्यनाथ बॅंकेला शेड्यूल्ड दर्जा मिळवून देण्यासाठी  लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनललाच विजयी करा- निळकंठ चाटे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैद्यनाथ बँकेमध्ये ठेवी वाढवून शेड्युल्ड दर्जा मिळवून देण्यासाठी पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी केले आहे.          केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात विस्तार आणि नामांकित असणाऱ्या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळासाठी उद्या रविवार दि. 10 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. सर्वसामान्य व्यापाऱ्यांना, छोट्या - मोठ्या गरजू कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देणारी व ठेवीदारांचा विश्वास असणाऱ्या वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे पॅनेलच्या उमेदवारांनाच निवडून देऊन सुरक्षित हातात बँक देण्याचे आवाहन करून ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून विश्वास कमावला असल्याचे म्हटल...

Vote Appeal:Vijaykumar Wakekar...

इमेज
वैद्यनाथ बँक ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर जलद सेवा देण्यासाठी लवकरच डिजिटल सेवांचा विस्तार - विजयकुमार वाकेकर परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक ही ग्राहकांच्या सेटिंग सेवेसाठी सदैव तत्पर असलेली आर्थिक संस्था असून जलद सेवा देण्यासाठी लवकरच डिजिटल सेवांचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे उमेदवार विजयकुमार वाकेकर यांनी दिली असुन या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पॅनलचे उमेदवार विजयकुमार वाकेकर यांनी केले आहे.      वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळासाठी उद्या रविवारी मतदान होणार असुन आज प्रचाराचा समारोप झाला. यावेळी विजयकुमार वाकेकर म्हणाले की, वैद्यनाथ बँक ही केवळ मराठवाडा असे नव्हे तर महाराष्ट्रात नावारूपाला आले असून राज्याच्या पर्यावरण हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आगामी काळातही बँक नवनवे यशोशिखर गा...

कोणा सभासदाचे कुठे मतदान?

इमेज
वैद्यनाथ बँक संचालक मंडळासाठी वैद्यनाथ महाविद्यालय आणि महिला महाविद्यालयात मतदान सभासद क्रमांक 1 ते 7747 हे वैद्यनाथ महाविद्यालयात तर 11794 पर्यंत महिला महाविद्यालयात मतदान परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणुकीत उद्या रविवारी मतदान होणार आहे. सभासद क्रमांक 1 ते 7747 हे वैद्यनाथ महाविद्यालयात तर 7747 ते 11794 यांचे मतदान हे कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात मतदान होणार आहे. मतदाराची ओळख पटविण्यासाठी विविध कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार असून सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन करण्यात आले आहे.      वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळासाठी रविवार दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सभासद क्रमांक 1 ते 7747 यांचे मतदान वैद्यनाथ महाविद्यालयात 19 मतदान केंद्रावर तर 7747 ते 11794 यांचे मतदान हे कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात 10 मतदान केंद्रावर मतदान होणार असून मतदारांनी काळजीने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  मतदाराची ओळख पटविण्यासाठी पुराव्यांची यादी     मतदाराची ओळख...

राष्ट्रीय सेवा योजनेचा अनोखा उपक्रम

इमेज
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोलीस बांधवांसमवेत साजरी केली राखी पौर्णिमा  राष्ट्रीय सेवा योजनेचा अनोखा उपक्रम परळी वैजनाथ दि.०८ (प्रतिनिधी)         येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवारी (ता.०८) येथील पोलीस ठाण्यात राखी पोर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन, पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे सह अधिकारी, कर्मचाऱ्यांचे औक्षण करून राख्या बांधल्या.        शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अनोखा उपक्रम राबवत पोलीस बांधवा समवेत राखी पौर्णिमा साजरी केली. पोलीस बांधवांना कोणताही सण साजरा करता येत नाही. नेमके यावेळी बंदोबस्तात वाढ केलेली असते. यामुळे सण, उत्सव साजरे करता येत नाहीत म्हणून येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पोलीस बांधवांना परिवारातील सदस्यांप्रमाणे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून, फुलांची उधळण करत व...

Rakshabandhan : राखी बांधण्यासाठी यंदा कोणता कालावधी योग्य?

इमेज
यंदा दिवसभरात कधीही बांधा राखी!         श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. 'रक्षाबंधन' ( Raksha Bandhan ) म्हणजे भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. या शुभ दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या मनगटावर एक पवित्र धागा बाधून ती त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो. श्रावण पौर्णिमेला आपण 'रक्षाबंधन' आणि 'नारळी पौर्णिमा' साजरी करतो. बहीण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतिक असलेला 'रक्षाबंधन' सण यंदा 09 ऑगस्टला साजरा होणार आहे.         पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरं केलं जातं. यंदा पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 21 मिनिटांपर्यंत ही तिथी समाप्त होणार आहे. मात्र, उदय तिथीनुसार, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा होणार आहे. सौभाग्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग 9 ऑगस्टच्या सूर्योदयापासून ते दुपारी 2:15 पर्यंत राहील.           पंचांगानुसार, 09 ऑगस्ट रोजी दिवसभर राखी बांधण...