
वसतिगृहात राहत असलेल्या १३ वर्षाच्या शाळकरी मुलाचे अपहरण केज :- केज येथे एका गुरुकुल वसतिगृहात राहून शिक्षण घेत असलेल्या इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला १३ वर्षीय मुलगा वस्तीगृहातून बाहेर पडल्यानंतर त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना केज शहरात १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. माजलगाव तालुक्यातील माली पारगाव येथील रोहित विजय चव्हाण वय (१३ वर्ष) हा केज शहरातील रामराव पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तर तो शहरात तांबवेश्वर मुलांचे गुरुकुल वस्तीगृहात वास्तव्यास होता. मागील आठवड्यात तो गावाकडे गेल्या नंतर परत वसतिगृहात जाण्यास नकार देऊ लागल्याने त्याचे वडील विजय चव्हाण व आई संगीता चव्हाण हे त्याला तुळजापुरला दर्शनासाठी घेऊन गेले. त्या नंतर परत जाताना १८ सप्टेंबर रोजी ४.३० वाजता या वस्तीगृहावर सोडून गेले. सायंकाळी ६.३० वाजता रोहित चव्हाण हा कोणाला न सांगता वस्तीगृहातून बाहेर पडला. तो परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्याचा तपास न लागल्याने त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार विजय ...