आंतर महाविद्यालयीन स्पर्धा...

ज्युडो क्रीडा स्पर्धेत वैद्यनाथ कॉलेजची विद्यार्थिनी कु.पूनम गीत्ते हिस रौप्य पदक परळी, प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व जनविकास महाविद्यालय बनसारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर महाविद्यालयीन ज्युडो क्रीडा स्पर्धा दि. १० ऑक्टोबर रोजी घेण्यात आल्या या क्रीडा स्पर्धेत वैद्यनाथ कॉलेजची विद्यार्थिनी कु.पूनम गोविंद गीत्ते या विद्यार्थिनींने रौप्य पदक मिळवले.कु.पूनम गीत्ते ही विद्यार्थिनी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये अग्रेसर असते. या यशाबद्दल जवाहर शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे व्ही जगतकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्या परिषद सदस्य व क्रीडा संचालक डॉ.पी एल कराड उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही गायकवाड, उपप्राचार्य डॉ.डी के आंधळे उपप्राचार्य हरीश मुंडे, विभाग प्रमुख व्ही व्ही बेंडसुरे, प्रा विजय मुंडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गीत्ते हिचे अभिनंदन केले आहे.