इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

गेवराईचे दुय्यम निबंधक संजय गोपवाड निलंबित 




गेवराई : उपनोंदणी कार्यालयातील दुय्यम निबंधक संजय गोपवाड यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली असून, या निर्णयामुळे संपूर्ण नोंदणी विभागात खळबळ उडाली आहे. नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्कातील गंभीर अनियमितता उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

       मिळालेल्या माह सन २०२० ते २०२१ या कालावधीत सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांची चौकशी करण्यात आली असता एकूण १४ व्यवहारांमध्ये गंभीर त्रुटी व अनियमितता आढळून आल्या. या अनियमिततेमुळे शासनाला १ लाख २३ हजार ४०० रुपयांचे महसूल नुकसान झाल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सदर अहवालाच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुय्यम निबंधक संजय गोपवाड यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. 

        या प्रकरणामुळे विभागात मोठी चर्चा रंगली असून, नोंदणी विभागातील इतर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन महसुलाशी संबंधित व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आता अधिक कडक पावले उचलली जाण्याची शक्यता असून स्थानिक नागरिक आणि विविध वर्गातूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, शासन महसूल गळती रोखण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या