पोस्ट्स

इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

काँग्रेस- वंचित आघाडीच्या प्रचाराचा फोडणार नारळ

इमेज
  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 22 नोव्हेंबर रोजी परळीत  काँग्रेस- वंचित आघाडीच्या प्रचाराचा फोडणार नारळ  परळी प्रतिनिधी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे 22 नोव्हेंबर रोजी परळी शहरात येत असून त्यांच्या हस्ते परळी नगरपरिषद निवडणुकीतील काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी दिली आहे.    याबाबत प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांची निवडणूक लढविण्यात येत आहे. या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ शनिवार,दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे. शहरातील मोंढा मार्केट येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात येईल.       माजी राज्यमंत्री व क...

गाठीभेटीवर भर!!!!

इमेज
  भाजपा - राष्ट्रवादी (अजित पवार) युतीची प्रभाग 14 मध्ये प्रचारात आघाडी सौ. पद्मश्री धर्माधिकारी, प्रा. पवन मुंडे, डॉ. पूजा तोतला यांना मतदारांचा प्रतिसाद परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भाजपा - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) युतीने प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार प्रा. पवन मुंडे, डॉ. पुजा तोतला यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध भागात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी प्रतिसाद दिला.      प्रभाग क्रमांक 14 मधील बाजीप्रभू नगर, घरणीकर कॉलनी, गुरुकृपा नगर आदी ठिकाणी उमेदवारांनी नागरिकांच्या भेटी गाठी घेत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ठिकठिकाणी मतदारांनी उमेदवारांचे स्वागत केले. तुमच्यामुळेच आमच्या विभागाचा विकास झाला असून आगामी काळातही आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत. असा शब्द यावेळी मतदारांनी उमेदवारांना दिला. युतीच्या उमेदवारांनाच प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.    प्रचार फेरीत उमेदवार प्रा....

दुःखद वार्ता :भावपूर्ण श्रद्धांजली....!!!!

इमेज
पिग्मी एजंट बसवंतआप्पा गौरशेटे यांचे निधन   परळी वैजनाथ / प्रतिनिधी    येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे पिग्मी एजंट कैलासवाशी बसवंतआप्पा भीमाशंकरआप्पा गौरशेटे वय 73 वर्ष यांचे दुःखद निधन  शहरात हळहळ व्यक्त . अत्यंत शांत, मनमिळाऊ, सर्वांना मदत करणारे पिग्मी एजंट म्हणून परिचित असलेले बसवंतआप्पा गौरशेटे यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर  गुरुवार रोजी सायंकाळी 6: ३० वाजता  येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर  डॉक्टर,वकील ,पत्रकार, व्यापारी, समाज बांधव तसेच मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.  परळी शहरातील सर्वपरिचित  व्यक्तीमत्व  वैद्यनाथ बँकेचे पिग्मी एजंट बसवंतआप्पा गौरशेटे यांची प्रकृती अचानक बिघडली  आसल्याने त्यांच्या वर उपचार करण्यासाठी लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला ते त्यांचा प्रेमळ स्वभाव, मैत्रीपणा आणि मनाला भिडणारी वागणूक देणारं एक पिग्मी एजंट म्हण...

सौ.संध्या दीपक देशमुख यांच्या विजयासाठी घेतला शुभाशीर्वाद

इमेज
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दिपक देशमुख यांनी घेतले भक्ती स्थळांचे दर्शन! श्री क्षेत्र भगवान गड, नारायण गड, सोयगाव दर्गा येथे जाऊन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.संध्याताई दीपक देशमुख यांच्या विजयासाठी घेतला शुभाशीर्वाद अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन केली प्रदीर्घ चर्चा परळी( प्रतिनिधी)- परळी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ संध्या ताई दीपक देशमुख यांचे पती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे नेते दीपक रंगनाथ देशमुख यांनी बीड जिल्ह्यातील श्रध्दास्थान असलेल्या तसेच बीड जिल्ह्यातील भक्ती आणि शक्ती असलेल्या श्रीक्षेत्र भगवान बाबा गड श्री क्षेत्र नारायण गड तसेच सोयगाव येथे दर्ग्याचे दर्शन घेतले.  महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड आहे. मोठ्या भक्ती भावाने त्यांनी श्रीक्षेत्र भगवानगड नारायणगड तसेच दर्ग्याचे आशीर्वाद घेऊन, परळीच्या सर्वांगीण विकासासाठी बळ येऊ दे असा आशीर्वाद त्यांनी मागितला. परळी नगरपरिषद निवडणूक प्रचारापूर्वी बीड जिल्ह्यातील भक्ती शक्ती आणि अध्यात्माचे श्रद्धास्थान असलेल्या गडाचे दर्शन घे...

दुःखद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली!!!!

इमेज
  श्रीमती सुमनबाई गित्ते यांचे निधन; रमेशभाऊ गित्ते यांना मातृशोक                         परळी (प्रतिनिधी) शहरातील स्नेहनगर येथील रहिवाशी श्रीमती सुमनबाई वैजनाथराव गित्ते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दि. २० नोहेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्या ८० वर्षाच्या होत्या. एस. टी. कामगार संघटनेचे नेते रमेशभाऊ गित्ते यांच्या त्या मातोश्री होत्या. श्रीमती सुमनबाई गित्ते यांच्या पार्थिवदेहावर  सार्वजनिक स्मशानभूमी परळी येथे सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.                        श्रीमती सुमनबाई गित्ते या धार्मिक सामाजिक कार्यात हिरारीने सहभाग घेत असल्याने त्या सर्वपरिचित होत्या. त्यांच्या अंत्ययात्रेत  डॉक्टर, वकील,  पत्रकार, एस. टी कर्मचारी वर्ग, राजकीय पक्षाचे,   सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते,  व्यापारी,  आदी मोठ्या संख्येने  सहभागी होते. यावेळी श्...
इमेज
उद्योग, शिक्षण, संस्कृती, समाजसेवा व रोजगारचा मजबूत पाया: प्रभाग 07 ला मिळाला नगरसेवकपदाचा  उद्योगी चेहरा ! महायुतीकडून सचिन सारडांची सक्षम व अश्वासक उमेदवारी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी  प्रभाग क्रमांक 07 मधून महायुतीकडून सचिन सारडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी आल्यामुळे प्रभाग क्रमांक 07 साठी उद्योग, शिक्षण, संस्कृती, समाजसेवा व रोजगारचा मजबूत पाया असलेला उमेदवार मिळाला आहे.           परळी नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 07 मधून महायुतीकडून उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सचिन सारडा यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नियोजनात व व्यवस्थापनात परफेक्ट, कार्यतत्पर आणि सामंजस्यपूर्ण नेतृत्व ही त्यांची ओळख असून, ते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्ण काम करीत आहेत. जनसेवेच्या कामात व लोकप्रतिनिधी म्हणून सचिन सारडांसारख्या उद्योगी युवकाला संधी देण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सचिन सारडा यांनी माहेश्वरी युवा संघटन च्य...
इमेज
  परळी नगर परिषद निवडणूक : प्रभाग १ मध्ये महायुती उमेदवारांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महायुती नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी व प्रभाग क्र.1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिपक मुंडे व भाजपचे उमेदवार सौ. वंदना अश्विनकुमार आघाव यांना मतदारांचा वाढता पाठींबा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-           परळी नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम चांगलीच वाढली असून प्रभाग क्र. १ मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, प्रभाग १-ब मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. दिपक प्रल्हादराव मुंडे आणि प्रभाग १-अ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ. वंदना अश्विनकुमार आघाव यांनी मतदारांशी संवाद साधला. सर्व उमेदवारांना मतदारांची पसंती मिळत आहे.        प्रभाग क्र.1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिपक मुंडे व भाजपचे उमेदवार सौ. वंदना अश्विनकुमार आघाव...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!