परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दिपक देशमुख यांनी घेतले भक्ती स्थळांचे दर्शन!
श्री क्षेत्र भगवान गड, नारायण गड, सोयगाव दर्गा येथे जाऊन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.संध्याताई दीपक देशमुख यांच्या विजयासाठी घेतला शुभाशीर्वाद
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन केली प्रदीर्घ चर्चा
परळी( प्रतिनिधी)- परळी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ संध्या ताई दीपक देशमुख यांचे पती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे नेते दीपक रंगनाथ देशमुख यांनी बीड जिल्ह्यातील श्रध्दास्थान असलेल्या तसेच बीड जिल्ह्यातील भक्ती आणि शक्ती असलेल्या श्रीक्षेत्र भगवान बाबा गड श्री क्षेत्र नारायण गड तसेच सोयगाव येथे दर्ग्याचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड आहे. मोठ्या भक्ती भावाने त्यांनी श्रीक्षेत्र भगवानगड नारायणगड तसेच दर्ग्याचे आशीर्वाद घेऊन, परळीच्या सर्वांगीण विकासासाठी बळ येऊ दे असा आशीर्वाद त्यांनी मागितला. परळी नगरपरिषद निवडणूक प्रचारापूर्वी बीड जिल्ह्यातील भक्ती शक्ती आणि अध्यात्माचे श्रद्धास्थान असलेल्या गडाचे दर्शन घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले. परळी न.प.नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्याताई दीपक देशमुख यांचे पती दीपक रंगनाथ देशमुख यांनी घेतली जरांगे पाटीलांची भेट घेतली.
परळी नगर पालिका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्याताई दीपक देशमुख यांचे पती दीपक रंगनाथ देशमुख ,महादेव गंगणे यानी मराठा आरक्षणाचे लढवय्ये नेते जरांगे पाटील यांची भेट घेऊन, आशीर्वाद घेतले.यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत परळी नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात प्रदीर्घ चर्चा व संवाद साधून रणनीती ठरवण्यात आली. दरम्यान मराठा आरक्षणाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे यांनी दीपक रंगनाथ देशमुख व महादेव गंगणे यांना पुढील वाटचालीसाठी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. याचबरोबर परळीचा सर्वांगीण विकास करून येथे सर्वधर्म समभावाची जोपासना करण्यासाठी बळ मिळू दे असे साकडे त्यांनी भक्तिस्थळांवर घातले. परळी शहराचे जुने वैभव नव्याने प्रस्थापित करून या शहराला नवी ओळख मिळवून देण्यासाठी कायम शपथबध्द राहण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा