इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

दुःखद वार्ता :भावपूर्ण श्रद्धांजली....!!!!

पिग्मी एजंट बसवंतआप्पा गौरशेटे यांचे निधन  





परळी वैजनाथ / प्रतिनिधी 

  येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे पिग्मी एजंट कैलासवाशी बसवंतआप्पा भीमाशंकरआप्पा गौरशेटे वय 73 वर्ष यांचे दुःखद निधन  शहरात हळहळ व्यक्त .

अत्यंत शांत, मनमिळाऊ, सर्वांना मदत करणारे पिग्मी एजंट म्हणून परिचित असलेले बसवंतआप्पा गौरशेटे यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर  गुरुवार रोजी सायंकाळी 6: ३० वाजता  येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर  डॉक्टर,वकील ,पत्रकार, व्यापारी, समाज बांधव तसेच मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.

 परळी शहरातील सर्वपरिचित  व्यक्तीमत्व  वैद्यनाथ बँकेचे पिग्मी एजंट बसवंतआप्पा गौरशेटे यांची प्रकृती अचानक बिघडली  आसल्याने त्यांच्या वर उपचार करण्यासाठी लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला

ते त्यांचा प्रेमळ स्वभाव, मैत्रीपणा आणि मनाला भिडणारी वागणूक देणारं एक पिग्मी एजंट म्हणून परिचित होते. शहर आणि तालुक्यातील सर्व समाज बांधव व राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत सलोख्याचे संबंध जोपासणारे म्हणून ओळखले जात होते. यांची अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मोठा परिवार असुन गौरशेटे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात दैनिक मराठवाडा साथी परिवार सहभागी आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बसवंतआप्पा गौरशेटे यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या