पोस्ट्स

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...
इमेज
  एडस् बाधितांना वाळीत टाकू नका-डॉ. बालाजी फड जागतिक एड्स दिन उत्साहात साजरा   परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)     शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयामध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.बालाजी फड, डॉ. कविता कराड, समुपदेशक शरद चव्हाण यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या स्वागतानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.व्ही.बी. कवडे यांनी प्रास्ताविक मांडले. त्यात त्यांनी जागतिक एड्स दिनाचा ऐतिहासिक व सामाजिक व आढावा घेतला. त्यानंतर डॉ.कराड मॅडम यांनी एडस् कशामुळे होतो ? त्याच्यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत याविषयी सविस्तर सांगून  त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांविषयी सविस्तर मार्गर्शन केले. याच विषयाला विस्तार...
इमेज
  प्रधान सचिव  सागर डोईफोडे यांचा फुलचंद कराड यांनी केला सत्कार परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- देशभरातील पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून भाविकांत ओळख असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दीव-दमन-दादर-नगर-हवेली येथील पर्यावरण, वने, आरोग्य पोर्ट, वैद्यकिय, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव (भारत सरकार) सागर डोईफोडे  यांनी सहपरिवार प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.  प्रधान सचिव (भारत सरकार) सागर डोईफोडे साहेब हे दोन दिवसाच्या परळी दौर्‍यावर आले असता त्यांनी फुलचंद कराड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सागर डोईफोडे यांच्याशी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेत वैद्यनाथ दूध डेअरी प्रकल्पाविषयी श्री कराड यांनी माहिती दिली. तुप, दहि, दूध, ताक असे विविध उत्पादन करण्यात येत असल्याने श्री कराड यांनी सांगितले. दरम्यान, मा.श्री.सागर डोईफोडे व पीआरओ किशोर सानप यांचा फुलचंदराव कराड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पाटलोबा मुंडे, प्रदीप आंधळे, संदिपान आंधळे, माऊली फड, नाथराव केंद्रे, दादाराव चव्हाण, संभाजी केंद्रे, बंडापल्ले, सुरेश मुंड...
इमेज
  मांडवा येथील काळभैरवाचे फुलचंद कराड यांनी घेतले दर्शन परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- परळी तालुक्यातील मांडवा येथील ग्रामदैवत श्री काळभैरवाचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्त शिवसेनेचे (शिंदेगट) महाराष्ट्र समन्वयक तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंदराव कराड यांनी मांडवा येथे जाऊन श्री काळभैरवाचे दर्शन घेतले. श्री काळभैरवाच्या वार्षिक उत्सवानिमित्त गुरूवारी (दि.4) ह.भ.प.रामायणाचार्य रामेश्वर महाराज महाजन यांचे काल्याचे किर्तन झाले. या किर्तनात फुलचंदराव कराड यांनी सहभाग नोंदवला तसेच महाप्रसादाचा लाभही घेतला. यावेळी मांडवा गावचे माजी सरपंच सुंदर मुंडे, डॉ.संतोष मुंडे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर फड, डॉ.मधुकर आघाव, संदिपान आंधळे, मोहन साखरे, कृष्णा चाटे, अरूण दराडे, कृष्णा नागरगोजे, अरूण फड आदी उपस्थित होते. याप्रसंगी फुलचंदराव कराड यांचा श्री काळभैरवाची प्रतिमा देवून गावकर्‍यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
इमेज
  वैद्यनाथ कॉलेज मध्ये  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माणुसकीचे प्रेरणास्त्रोत - प्राचार्य डॉ. जगदीश जगतकर परळी - वै.  प्रतिनिधी...       जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ कॉलेज येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्राचार्य,डॉ. जगदीश जगतकर यांनी महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे व्ही जगतकर यांनी भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर हे माणुसकीचे प्रेरणास्त्रोत होते असे गौरव उद्गार या प्रसंगी काढले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे  प्राचार्य, डॉ. जगदीश जगतकर , उपप्राचार्य डी. के. आंधळे , उपप्राचार्य डॉ.  विनोद गायकवाड, उपप्राचार्य प्रा.हरीश मुंडे , यांची उपस्थिती होती.         या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर प्रकाश टाकताना मानवतेचा संदेश संपूर्ण देशाला दिला. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबां...

जिरेवाडी च्या श्रीसोमेश्वर मंदिरातील चोरी प्रकरण....

इमेज
  देवाच्या घरात चोरी करणाऱ्या पाच जणांना पोलीसांनी पकडले : 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      दिनांक 25/11/2025 रोजी रात्री 10.30 वा.ते दिनांक 26/11/2025 रोजी सकाळी 05.00 वा.च्या दरम्यान जिरेवाडी ता. परळी वैजीनाथ जि. बीड येथील सोमेश्वर संस्थानाचे मंदिराचे सभागृहाचे गेटचे कुलूप तोडुन आत प्रवेश करुन मंदिराचे गाभा-यातील दानपेटीचे कुलुप तोडुन अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन मंदिरातील दानपेटीतील रक्कम अंदाजे 30,000/- रुपये व मौल्यवान दागीने चांदीची चंद्रकोर, एक ग्राम वजनाचे सोन्याचे टाक चोरले होते. त्यावरुन फिर्यादी पाटलोबा सिताराम मुंडे वय 45 रा.जिरेवाडी सोमेश्वर संस्थान जिरेवाडी समिती उपाध्यक्ष रा. जिरेवाडी ता. परळी वैजीनाथ यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन परळी ग्रामीण गुरनं. 499/2025 कलम 331(4), 305 (अ) बीएनएस प्रमाणे दिनांक 26/11/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.      नमुद गुन्हयाचा बारकाईने तपास करुन आणि गोपनिय बातमीदारांकडुन सदर गुन्हयातील आरोपींबाबत अधिक माहिती प्राप्त करुन घेऊन 1) वैभव विष्णु कोकरे वय 19 रादौनापूर तालुका प...

प्रा.डाॅ.सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख.....

इमेज
  आंबेडकरी चळवळ: एक सखोल चिंतन  ६ डिसेंबर १९५६ रोजी प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाने भारतीय समाजजीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली. आज ६९ वर्षांनंतरही त्यांचे विचार आणि त्यांनी प्रस्थापित केलेली आंबेडकरी चळवळ कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणास्रोत आहे. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, या चळवळीने भूतकाळात काय साधले, आज तिची स्थिती काय आहे आणि भविष्यात तिची दिशा काय असेल, याचे सखोल चिंतन करणे काळाची गरज आहे. *उद्दिष्टे आणि क्रांतीचा कालखंड*:- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली चळवळ केवळ राजकीय किंवा आर्थिक सुधारणांची मागणी नव्हती, तर ती भारतीय समाजाच्या मूळाशी असलेल्या जातिव्यवस्थेविरुद्धची सामाजिक-सांस्कृतिक क्रांती होती. अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाज घटकांना 'माणूस' म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणे, त्यांना सामाजिक समता, स्वातंत्र्य आणि न्याय प्रदान करणे हे मूलभूत उद्दिष्ट होते. मनुस्मृतीचे दहन, महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश यांसारख्या कृतिशील आंदोलनातून समाजाला आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. भारतीय संविधानाची निर्मिती हे या चळवळीचे सर्वा...
इमेज
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमवाडी मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर ;35 रक्तदात्यांनी केलं रक्तदान परळी / प्रतिनिधी....     विश्वरत्न ,बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परळी येथील भिमवाडी मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील भिमवाडी मित्र मंडळाच्या युवकांनी रक्तदानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या रक्तदान शिबिरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले .रक्तदात्यांचा यावेळी सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.   या रक्तदान शिबिराचे उद्घाटन  परळी संभाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मनोहर मुंडे ,सुनील कांबळे , महेंद्र रोडे,शरण मस्के, राहुल गोदाम , यशपाल मुंडे, तथागत धाटे, रवी मुळे ,सचिन रोडे, राहुल इंगळे, कपिल गायकवाड ,विजय व्हावळे ,सनी कसबे यांच्यासह भीमवाडी येथील युवक उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!