स्व. अजितदादांनी बीड येथील ऊसतोड कामगार मेळाव्यात धनंजय मुंडेना दिला होता शब्द!
धनंजय मुंडेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास मोठे यश; ऊसतोड कामगारांच्या मुला - मुलींना दर्जेदार शिक्षणाची वाट मोकळी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून बीड जिल्ह्यात आणखी ११ वसतिगृहे उभारणीस शासनाकडून १५९.३६ कोटी रुपये निधी उपलब्ध! मुंबई (प्रतिनिधी) - लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सुरू केलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेला व्यापक स्वरूप प्राप्त होत असून धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री असताना २५ जून, २०२१ रोजी या योजनेची घोषणा करून प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली होती. त्यामुळे मुंडे जनक असलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये शंभर क्षमतेचे मुलींसाठी एक व मुलांसाठी एक असे एकूण 22 वसतीगृह मंजूर करून भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आलेले आहेत. दरम्यान त्यापैकी आतापर्यंत तीन वसतीगृहांना स्वतःची जागा व निधी मिळालेला असून त्याचे बांध...