पूज्य गुरुदेव - राष्ट्रनिर्माण, मानवसेवा आणि सनातन धर्माचा तेजस्वी वारसा!




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हरिद्वार, उत्तराखंड येथे, पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभ येथे उपस्थिती दर्शविली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांनी सामान्य घरातून आलेल्या पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांचा असामान्य व अद्भुत प्रवास सांगितला, जो खूप महत्त्वपूर्ण आहे. 


पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांनी अध्यात्माबरोबरच राष्ट्रनिर्माणासाठीच्या मूल्यांचा प्रचार व प्रसार केला. तसेच भारतमातेचे मंदिर उभारून पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांनी सनातन धर्माच्या वेगवेगळ्या विचारांना एकत्र आणण्याचे कार्य केले, कारण विचार जरी अनेक असले, तरी संत त्यांना जोडण्याचे काम करतात, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 


पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांनी समाजामधील दुजाभाव दूर करून सनातन धर्म एकजूट असल्याचे आपल्या कर्तव्यामधून दाखवून दिले. त्यामुळे एक अद्भुत व्यक्तिमत्व म्हणून भारत देश आणि संपूर्ण विश्व त्यांना ओळखते. अशा गुरूंचे समाधी मंदिर व मूर्तीस्थापना समारंभ होणे ही पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतात सनातन संस्कृतीचे पुनरुत्थान होत आहे. युवा पिढी ही सनातन विचारांशी जोडली जात आहे. युवा पिढीला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटत आहे, जी आनंदाची बाब आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, जुनापीठाधिश्वर आचार्य महामंडलेश्वर प.पू. स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!