प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

शारदाविद्यामंदिर, बँक कॉलनी येथे परीक्षा केंद्र.....

 परळीतील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू






परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

            महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाल्या आहेत. परळी वैजनाथ शहरातील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयच्या परीक्षा शारदाविद्यामंदिर, बँक कॉलनी येथे इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू असल्याची प्रतिक्रिया केंद्रप्रमुख एस.आर.कापसे यांनी दिली. 

        नाथ शिक्षण संस्था संचलित, परळी वैजनाथ संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे इयत्ता बारावीच्या परीक्षा शिक्षण विभागाच्या निर्दशाचे पालन करत परीक्षा सुरळीत सुरू आहेत. 

       परिक्षा केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त होता. तसेच यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयच्या बारावीच्या परीक्षा शारदाविद्यामंदिर येथे सुरळीत सुरू आहे. परीक्षा केंद्रावर कडक शिस्तीत बारावीच्या कॉपीमुक्त परीक्षा पार पडत आहेत. परीक्षा केंद्रांवर भरारी पथक व बैठे पथक, सीसीटीव्ही निरीक्षण व सतत तपासणी व प्रशासनाची काटेकोर नजर ठेवण्यात आली असून विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा देता येत आहे.इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा  आज पेपर सुरळीत पार पडला या केंद्रावर २७८ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

             शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून बारावीच्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपरची परीक्षा  यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयच्या परीक्षा शारदाविद्यामंदिर, बँक कॉलनी येथे इयत्ता बारावीच्या परीक्षा या केंद्रांवरील परीक्षा शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या