इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

 कै.डॉ. मंचकराव नरहरराव देशमुख यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त परळीत भव्य मोफत आरोग्य शिबिर




परळी ( प्रतिनिधी).....

       कै. डॉ. मंचकराव नरहरराव देशमुख यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त परळी वैजनाथ येथे दि. ८ व ९ फेब्रुवारी २०२६ (रविवार व सोमवार) रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर देशमुख अक्युपंचर सेंटर, देशमुख कॉम्प्लेक्स, गणेश पार, परळी वैजनाथ येथे होणार आहे.

या शिबिरात नागरिकांसाठी विविध आजारांवर मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार असून, विशेषतः अर्धांगवायू, पायांची नस दाबली जाणे, सांधेदुखी, मणक्याचे आजार, टाच दुखी, फ्रोजन शोल्डर, स्पॉन्डिलायटिस, सायटिका, कंबर व मानदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे, स्नायू आखडणे, स्पोर्ट्स व लिगामेंट इजा, वजन कमी करणे, तसेच लहान मुलांचे टांग न धरणे व मतिमंद मुलांवरील उपचार करण्यात येणार आहेत.

शिबिरात अक्युपंचर थेरपी, सुजोक थेरपी, कपिंग थेरपी (बोन सेटिंग), कायरोप्रॅक्टिक, अक्युप्रेशर व फिजिओ थेरपी अशा आधुनिक व प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध असणार आहेत.या उपक्रमात डॉ. राहुल देशमुख (अक्युपंचर व कायरोप्रॅक्टिक तज्ञ) आणि सौ. साधना देशमुख (अक्युपंचर थेरपिस्ट) हे रुग्णसेवा देणार आहेत.

कै. डॉ. मंचकराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजोपयोगी उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी ९८६०४९१००२, ७०२०४९०९२९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या