पोस्ट्स

संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा अभिनव उपक्रम

इमेज
परळीत संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, सहाय्यक आयुक्त मा. विशाल लोंढे,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांची उपस्थिती लाभणार संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा अभिनव उपक्रम परळी (प्रतिनिधी):-संत परंपरेतील समाजप्रबोधनाची अखंड ज्योत असलेल्या संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, परळी यांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. परळी परिसरातील सर्व अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या प्रेरणादायी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक तथा संस्थेचे सचिव पृथ्वी शिंदे यांनी केले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा ८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन (२०१६) चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस हे राहणार आहेत. उद्घाटक म्हणून सम...
इमेज
  जवळा फकीर येथे 28 फेब्रुवारी रोजी दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद  परळी (प्रतिनिधी)  ज्ञानालंकार धम्म संस्कार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जवळा फकीर,ता.धारूर येथे दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक भदन्त पय्यातीस्स महाथेरो यांनी केले आहे.      मृगदायवन महाविहार सारनाथ पार्क जवळा फकीर तालुका धारुर येथे शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता या धम्म परिषदेचे उद्घाटन डॉ.प्रा.खेमधम्मो,मुळावा यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी डॉ.भदन्त उपगुप्त महाथेरो,पूर्णा, ध्वजारोहण डॉ.प्रा.भदन्त एम.सत्यपाल महाथेरो छत्रपती संभाजी नगर, प्रमुख अतिथी पु.भदन्त डॉ.इंदवंश महाथेरो,कुशीनगर, उत्तर प्रदेश, भदंत मुदितानंद महाथेरो,परभणी,भदन्त पय्याबोधी थेरो, नांदेड, भदंत पय्यानंद थेरो लातुर यांची उपस्थिती असणार आहे.    याबरोबरच भदन्त धम्मसार थेरो किल्लारी, भदंत सुभूती थेरो नांदेड, भदंत धम्मशील थेरो बीड, भदंत नागसेन बोधी उदगीर,आदी भन्ते व बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोट...
इमेज
शिवरायांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे होते- रानबा गायकवाड  परळी प्रतिनिधी.           रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात सर्व जाती धर्मांचे मावळे होते ,सैनिक होते असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक भीमयुगकार रानबा गायकवाड यांनी केले. ते परळी तालुक्यातील मौजे इंदपवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवरायांच्या 396 व्या शिवजयंती उत्सवात बोलत होते.       इंदापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. शालुबाई मुंडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाणे, पत्रकार विकास वाघमारे, माजी सरपंच मोहन मुंडे, ह. भ. प. बापू महाराज तसेच निवृत्त शिक्षक भोसले सर, जे.के चौधरी सर ,सतीश मुंडे, उमेश रोडे, राम मुंडे, सचिन मुंडे, विशाल चाटे, पप्पू रोडे आदी उपस्थित होते.      यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ...
इमेज
कै.सौ.केराबाई अंबादास मुंडे यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम ;विठ्ठल महाराज (उखळीकर), साध्वी सोनालीताई करपे यांचे कीर्तन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....     कै.सौ. केराबाई अंबादास मुंडे यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम शुक्रवार दि. 20/02/ 2026 रोजी आयोजित आला असून यानिमित्त ह भ प  विठ्ठल महाराज (उखळीकर), ह भ प साध्वी सोनालीताई करपे यांचे कीर्तन होणार आहे.      कै.सौ. केराबाई अंबादास मुंडे यांना रविवार, दिनांक 08/02/2026 रोजी रोजी देवाज्ञा  झाली. त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम शुक्रवार दि. 20/02/ 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने हनुमान मंदिर, इंदपवाडी, ता. परळी वै. जि. बीड येथे शनिवार, दि. 21/02/2026 रोजी दुपारी 12 ते 2 वा.ह.भ.प. साध्वी सोनालीताई करपे (चकलवा) यांचे किर्तन होईल. रात्री 8 ते 10 वा.ह.भ.प.विठ्ठल महाराज (उखळीकर) यांचे किर्तन होईल. किर्तनास व भोजनास उपस्थित रहावे असे आवाहन अंबादास नारायण मुंडे, दत्तात्रय अंबादास मुंडे, श्रीधर अंबादास मुंडे यांनी केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परळी वैजनाथ तर्फे मानवंदना

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त परळी सघोष मानवंदना ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परळी वैजनाथ तर्फे मानवंदना परळी वै - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परळी वैद्यनाथ तर्फे सघोष मानवंदना देण्यात आली. यावेळी या मानवंदनेने उपस्थित शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. या मानवंदनेसाठी स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले होते यावेळी तालुका संघचालक व तालुका पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर अक्षरशा दणाणून गेला होता. यावेळी स्वयंसेवकांची तसेच शिवभक्तांची लक्षणीय उपस्थिती होती.     काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे तसेच महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती निमित्त महर्षी वाल्मिकी चौक या ठिकाणी सुद्धा स्वयम् सेवकांकडून सघोष मानवंदना देण्यात आली होती.
इमेज
  ओबीसी परिषदे तर्फे छ.शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा परळी वै., प्रतिनिधी - ओबीसी परिषदे तर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करण्यात आला.  छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून रयतेचे लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हतबल झालेल्या भूमिपुत्रांच्या मनात धैर्य, शौर्य, आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्योत पेटवली. आपण महाबलाढ्य शत्रूविरूध्द लढू शकतो. आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तमप्रकारे राज्यकारभार करू शकतो, ही प्रेरणा जनमानसात विशेषतः सर्वसामान्य मावळ्यांच्या मनात कायमची पेरली. त्यांनी अशक्य कार्य शक्य करून दाखविले. शेतकरी, कष्टकरी, महिला, उपेक्षित समाजघटकांना धैर्य आणि स्थैर्य दिले. त्यांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. त्यांनी स्वराज्यातील आणि परराज्यातील स्त्रियांचा आदर केला त्यांना सुरक्षितता दिली. आपल्या धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांचा अभिमान बाळगला, पण इतरांच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपराचा अनादर केला नाही. आपल्या वैभवशाली सांस्कृति...

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सकारात्मक

इमेज
परळी वैजनाथ नगर परिषदेतील रिक्त ३२ पदे तातडीने भरण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सकारात्मक परळी वैजनाथ : प्रतिनिधी.....   राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजाताई मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी व नगरपरिषदेच्या वतीने परळीचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी व बांधकाम सभापती प्रा. पवन मुंडे यांनी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन परळी नगर परिषदेतील वर्ग-३, वर्ग-४ तसेच अनुकंपा तत्वावरील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली. यासंदर्भात जिल्हा निवड समितीमार्फत भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हा विषय प्राधान्याने हाताळून सकारात्मक कार्यवाही करू, असे अभिवचन दिल्याची माहिती धर्माधिकारी यांनी दिली. परळी नगर परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, पंप ऑपरेटर, तारतंत्री ऑपरेटर, वाहन चालक-कम-ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्...
इमेज
समायोजन वेळापत्रकाची  मराठवाडा शिक्षक संघाने केली होळी ! छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : मराठवाडा शिक्षक संघाने शासनाच्या संचमान्यता निकष व समायोजन वेळापत्रकाविरुद्ध आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश एस एस सी व एच एस सी बोर्ड परीक्षेच्या काळात नियोजित समायोजन प्रक्रिया तारखा बदलण्यात याव्यात आणि १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयातील ९वी व १०वी च्या किमान संख्येच्या अटींमुळे राज्यातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात फुगलेली आहे, त्यात संशोधन करून सुधारित निकष तयार करण्यात आले पाहिजे हा आहे. तसेच एच एस एस सी बोर्ड परीक्षेत मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शिक्षकांवर सरसकट गुन्हे दाखल होत आहेत त्याची संपूर्ण चौकशी शिवाय सरसकट गुन्हे दाखल करू नयेत ही बाब अन्यायकारक व कायदेशीर नाही याची दखल घेत निर्दोष शिक्षकांवर होत असलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावे या प्रमुख मागणीसाठी मराठवाडा शिक्षक संघ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी विभागीय उपसंचालक कार्यालय, भडकल गेट, छत्रपती संभाजीनगर येथे हे आंद...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....