ओबीसी परिषदे तर्फे छ.शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा



परळी वै., प्रतिनिधी -

ओबीसी परिषदे तर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करण्यात आला. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून रयतेचे लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हतबल झालेल्या भूमिपुत्रांच्या मनात धैर्य, शौर्य, आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्योत पेटवली. आपण महाबलाढ्य शत्रूविरूध्द लढू शकतो. आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तमप्रकारे राज्यकारभार करू शकतो, ही प्रेरणा जनमानसात विशेषतः सर्वसामान्य मावळ्यांच्या मनात कायमची पेरली. त्यांनी अशक्य कार्य शक्य करून दाखविले. शेतकरी, कष्टकरी, महिला, उपेक्षित समाजघटकांना धैर्य आणि स्थैर्य दिले. त्यांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. त्यांनी स्वराज्यातील आणि परराज्यातील स्त्रियांचा आदर केला त्यांना सुरक्षितता दिली.

आपल्या धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांचा अभिमान बाळगला, पण इतरांच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपराचा अनादर केला नाही. आपल्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरांचे त्यांनी मनोभावे संरक्षण केले. त्यांनी आपल्या सांस्कृतिक परंपराचा अभिमान बाळगताना त्याचे अवडंबर केले नाही. ते धार्मिक होते. तेवढेच प्रागतिक विचारांचे होते. 

अशा या शिवाजी महाराजांना  ओबीसी परिषदेचे तालुका अध्यक्ष विलास ताटे, भिमराव सातपूते, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजीत रोडे, रमाकांतअप्पा निर्मळे, सुनिल फुलारी, हरिभाऊ मोदाणी, दत्ता मुरूडकर, साहेबराव रोडे, कर्डीले सर आदींनी मानाचा मुजरा केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!