नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा अभिनव उपक्रम

परळीत संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन




प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, सहाय्यक आयुक्त मा. विशाल लोंढे,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांची उपस्थिती लाभणार


संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा अभिनव उपक्रम

परळी (प्रतिनिधी):-संत परंपरेतील समाजप्रबोधनाची अखंड ज्योत असलेल्या संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, परळी यांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. परळी परिसरातील सर्व अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या प्रेरणादायी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक तथा संस्थेचे सचिव पृथ्वी शिंदे यांनी केले आहे

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा ८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन (२०१६) चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस हे राहणार आहेत. उद्घाटक म्हणून समाज कल्याण विभाग, पुणे येथील सहाय्यक आयुक्त मा. विशालजी लोंढे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून देवाची आळंदी येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांची उपस्थिती लाभणार आहे.

या सोहळ्यात “फुले, शाहू, आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यातील संवादी समता आणि परिवर्तनवादी विचार” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांतील समान धागे, सामाजिक समता, शिक्षण, स्वच्छता व परिवर्तनाची दिशा यावर सखोल चिंतन करण्यात येणार आहे.

याच वेळी प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, सामाजिक कार्यात अग्रक्रमी योगदान देणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय ‘राष्ट्रसंत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सांगता ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या समाजप्रबोधनपर कीर्तनाने होणार असून, कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृतीचा संदेश दिला जाणार आहे. मानवतावादी विचारधारेचे परळी परिसरातील सर्व अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या प्रेरणादायी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक तथा संस्थेचे सचिव पृथ्वी शिंदे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या