जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सकारात्मक

परळी वैजनाथ नगर परिषदेतील रिक्त ३२ पदे तातडीने भरण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन



जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सकारात्मक

परळी वैजनाथ : प्रतिनिधी.....

  राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजाताई मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी व नगरपरिषदेच्या वतीने परळीचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी व बांधकाम सभापती प्रा. पवन मुंडे यांनी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन परळी नगर परिषदेतील वर्ग-३, वर्ग-४ तसेच अनुकंपा तत्वावरील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली. यासंदर्भात जिल्हा निवड समितीमार्फत भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हा विषय प्राधान्याने हाताळून सकारात्मक कार्यवाही करू, असे अभिवचन दिल्याची माहिती धर्माधिकारी यांनी दिली.

परळी नगर परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, पंप ऑपरेटर, तारतंत्री ऑपरेटर, वाहन चालक-कम-ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, शिपाई, फायरमन आदी एकूण २३ पदे रिक्त आहेत. याशिवाय अनुकंपा तत्वावरील ९ उमेदवारांचे अर्ज प्रलंबित असून त्यांनाही न्याय देण्यासाठी तत्काळ नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. वर्ग-३, वर्ग-४ आणि अनुकंपा तत्वावरील एकूण ३२ पदे भरल्यास नगर परिषदेतील स्थायी कर्मचाऱ्यांची संख्या वाढून प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल तसेच शहराच्या विकासकामांना चालना मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार