राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परळी वैजनाथ तर्फे मानवंदना

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त परळी सघोष मानवंदना !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परळी वैजनाथ तर्फे मानवंदना


परळी वै - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परळी वैद्यनाथ तर्फे सघोष मानवंदना देण्यात आली. यावेळी या मानवंदनेने उपस्थित शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. या मानवंदनेसाठी स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले होते यावेळी तालुका संघचालक व तालुका पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर अक्षरशा दणाणून गेला होता. यावेळी स्वयंसेवकांची तसेच शिवभक्तांची लक्षणीय उपस्थिती होती.

    काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे तसेच महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती निमित्त महर्षी वाल्मिकी चौक या ठिकाणी सुद्धा स्वयम् सेवकांकडून सघोष मानवंदना देण्यात आली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!