नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

शिवरायांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे होते- रानबा गायकवाड 




परळी प्रतिनिधी.      

    रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात सर्व जाती धर्मांचे मावळे होते ,सैनिक होते असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक भीमयुगकार रानबा गायकवाड यांनी केले. ते परळी तालुक्यातील मौजे इंदपवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवरायांच्या 396 व्या शिवजयंती उत्सवात बोलत होते. 

     इंदापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. शालुबाई मुंडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाणे, पत्रकार विकास वाघमारे, माजी सरपंच मोहन मुंडे, ह. भ. प. बापू महाराज तसेच निवृत्त शिक्षक भोसले सर, जे.के चौधरी सर ,सतीश मुंडे, उमेश रोडे, राम मुंडे, सचिन मुंडे, विशाल चाटे, पप्पू रोडे आदी उपस्थित होते. 

    यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाकाय औरंगजेबाच्या सैन्यालाच नव्हे तर अदिलशहा,सिद्दी मोगल राजांना तसेच डच फ्रेंच इंग्रज व पोर्तुगीज यांना सुद्धा सळो की पळो करून सोडले. शिवरायांनी कधीच शत्रूवर चाल करून जाताना मुहूर्त पाहिला नाही म्हणजेच शिवरायांनी अंधश्रद्धेला अजिबात थारा दिला नाही. तर यावेळी बोलताना नवनाथ दाणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभर नवे जगात साजरी करण्यात येते. यामागे शिवरायांची व त्यांच्या कार्याचे आजच्या पिढीला जाणीव व्हावी ,प्रेरणा मिळावी तसेच शिवरायांच्या युद्धनीती व इतर कार्याचा आदर्श घेता यावा यासाठी जयंती महत्त्वाची असल्याचे सांगितले. 

   इंदपवाडी येथे साजरे करण्यात आलेल्या शिवजयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात एकही मराठा बांधवांचे घर नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत हे डोळ्यासमोर ठेवून गावकऱ्यांनी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या वतीने या जयंतीचे उत्कृष्ट असे आयोजन केले होते. एवढेच नाहीतर या कार्यक्रमात शालेय विद्यार्थिनी धनश्री मुंडे, तनुजा मुंडे, गायत्री चाटे, दत्तात्रय मुंडे आदी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर सुंदर असे भाषणे केली.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशव मुंडे यांनी केले केले.सूत्रसंचालन आदर्श शिक्षक चंद्रशेखर फुटके यांनी तर आभार प्रदर्शन चौधरी सर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना बाल सभा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण पावण्याचे हस्ते करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या