#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

विविध पक्ष , संघटनांचा व नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा

19 कोटी रुपयांचे  टेंडर रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू 




विविध पक्ष , संघटनांचा व नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा 

 परळी (प्रतिनिधी)...

    परळी वैजनाथ शहरात यापूर्वी नगरोत्थान सुवर्ण जयंती शहरी विकास योजना अंतर्गत 110 कोटी रुपयांची अपूर्ण व निकृष्ट दर्जाची कामे करणा- या लातूर येथील श्रीनाथ इंजिनियर यांना  डी.पी.डी.सी.2025-2026 अंतर्गत 19 कोटी रुपयांची विविध विकास कामांचे दिलेले टेंडर त्वरित रदद करावे यावे व संबंधित एजन्सी ला ब्लॅकलिस्ट करावे या मागणीसाठी  नगर परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले.या उपोषणाला विविध पक्ष व संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी जाहीर पाठिंबा दिला.

        श्रीनाथ इंजिनियर लातूर यांनी यापूर्वी नगरोत्थान योजनेअंतर्गत असलेली 110 कोटी रुपयांची कामे पूर्ण केलेली नाहीत .शहरातील भुयारी गटाराचे चेंबर अनेक ठिकाणी रस्त्यावर उंच तर काही ठिकाणी खोल असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेक नागरिकांना अपघातात गंभीर दुखापती झाल्या आहेत.विविध पक्ष व संघटना आणि नागरिकांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत. तरीही  संबंधित एजन्सीला १९ कोटी रुपयांच्या  कामांचे टेंडर देण्यात आले. श्रीनाथ इंजिनियर लातूर यांचा यापूर्वी नगरोत्थान योजनेअंतर्गत कामातील परळीकरांना आलेला वाईट अनुभव लक्षात घेता सध्या काढण्यात आलेले 19 कोटी रुपयांची कामे टेंडर रद्द करून  व  चांगल्या दर्जाची कामे व्हावेत याकरिता परत टेंडर काढावे अशी मागणी करण्यात आली आहे.उपोषणाला पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रानबा गायकवा, धीरज जंगले, शहराध्यक्ष शेख मुकरम, उपाध्यक्ष बाबा शेख  उपोषणाला बसले आहेत.

   या उपोषणाला शिवसेना नेते तथा नगरसेवक व्यंकटेश शिंदे, शहरप्रमुख वैजनाथ माने, कामगार नेते गौतम आगळे, अश्विन मोगरकर, नगरसेवक नितीन बागवाले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, प्रसेनजित रोडे, राजेश सरवदे, कांग्रेस अल्पसंख्याक शहर अध्यक्ष रसूल खान, सामाजिक कार्यकर्ते राहुल घोबाळे,प्रा.विलास रोडे,  संपादक ज्ञानोबा सुरवसे, इंजिनियर भगवान साकसमुद्रे,  भगिरथ बददर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शहराध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले, माजी  नगरसेवक केशव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रमेश फड, कामगार संघटनेचे शेख जमीर याबरोबरच संपादक संपादक बालासाहेब कडबाने, गणेश आदोडे, संपादक रामप्रसाद गरड, संपादक शिवशंकर झाडे, संपादक मोहन व्हावळे, पत्रकार धनंजय आढाव, संपादक कैलास डुमणे,प्रा प्रविण  फुटके,संजीव रॉय, महादेव शिंदे,  माणिक कोकाटे,  सुमीत गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....