ना पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून उर्वरित काम पूर्णत्वास घेऊन जाणार...

 परळीतील भगवान विश्वकर्मा मंदिर : माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केली पूजा व आरती




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :

       द्वादश ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ नगरी परळी वैजनाथ येथील  भगवान विश्वकर्मा मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न होत आहे. या निमित्ताने माजी नगराध्यक्ष नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी  उपस्थित राहून भगवान विश्वकर्मा यांची पूजा व आरती केली. 

          यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी उपस्थित भाविक बांधवांना शुभेच्छा देताना सांगितले की, सृष्टीचे दिव्य शिल्पकार व निर्माणकलेचे अधिष्ठाता भगवान विश्वकर्मा यांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगती नांदो, हीच प्रार्थना आहे.मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात  भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. धार्मिक विधी, पूजा-अर्चा व आरतीच्या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर मंगलमय वातावरणाने भारावून गेला. यावेळी विश्वकर्मा मंदिर च्या वतीने बाजीराव भैया धर्माधिकारी यांचा हृदय सत्कार करण्यात आला.

    विश्वकर्मा मंदिरसाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी निधी दिला होता. यातून हे सभागृह निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे या मंदिराच्या  दुसऱ्या मजल्यासाठीही ना. पंकजाताई मुंडे व आ धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून  निधी मंजूर करून देण्यात येईल. लवकरच हा निधी पण या मंदिराला मिळेल अशी ग्वाही बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी यावेळी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...