युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- *सिरसाळा हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ......!* *कौडगाव घोडा येथे शस्त्रांचा धाक दाखवून पावणे दोन लाखांची घरफोडी; नागरिकांमध्ये दहशत*

 *सिरसाळा हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ......!*

*कौडगाव घोडा येथे शस्त्रांचा धाक दाखवून पावणे दोन लाखांची घरफोडी; नागरिकांमध्ये दहशत* 

 

 परळी वैजनाथ/प्रतिनिधी......

     सिरसाळा परिसरात दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे.सिरसाळ्याच्या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन शस्त्रांचा धाक दाखवून घरफोडीची मोठी घटना कौडगाव घोडा येथे दि.२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.या घटनेने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.   या घरफोडीत सुमारे पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

       

      सध्याच्या काळात सर्वत्र चोरीच्या घटननांची साखळी खंडीत होत नसल्याने लोकांमध्ये एकप्रकारे मोठा धसका बसलेला आहे.अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता चोरीच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाचे प्राधान्य आहे.अशाही परिस्थितीत चोरट्यांची मनस्थिती मात्र बदललेली दिसत नाही.सर्वत्र चोरटे धुमाकूळ घालत आहेत. दररोज चोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होत आहे.काल (दि.२६) परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथे फिर्यादी मधुकर बाबुराव आगजाळ वय ६० वर्षे यांच्या घरातच किराणा दुकान आहे. रात्रीच्या सुमारास अनोळखी चार इसम घराचे चॅनल गेट तोडुन घरात घुसले.फिर्यादीच्या पत्नीस चाकु व कत्तीचा धाक दाखवून, मारहाण करून तब्बल १लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केला. सशस्त्र चोरट्यांनी अक्षरशः सिनेस्टाईल धुमाकूळ घालत घरफोडी केली. अज्ञात चार चोरट्यांनी घुसुन घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा१लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. विशेष म्हणजे चोरटे चार जण होते.त्यांच्या तोंडावर रुमाल बांधलेले होते,हातात धारदार शस्त्र होती . चोरट्यांनी घरात प्रवेश करुन थेट मारहाण सुरू केली शस्त्रांचा धाक दाखवला.फिर्यादीच्या पत्नीला मारहाण केली.याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.उपनि.शेळके हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या