MB NEWS:परळीत उद्या भाजप - शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा

परळीत उद्या भाजप - शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा



छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला होणार सुरुवात ; सावरकर प्रेमींनी मोठया संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन

परळी वैजनाथ।दिनांक ०५।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या सूचनेनुसार शहरात उद्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्या वतीने सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे, या यात्रेत पदाधिकारी कार्यकर्ते व सावरकर प्रेमी नागरिकांनी मोठया संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे.



  राहूल गांधी व अन्य काँग्रेसी नेत्याकंडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे, त्याला उत्तर म्हणून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. उद्या भाजपचा स्थापना दिन आहे, त्यानिमित्त ६ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सावरकर गौरव मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघून बस स्टँड रोड - एक मिनार चौक - अग्रवाल लाॅज - स्टेशन रोड- रामपालजी लोहिया यांचे दुकानाचे काॅर्नर - सुभाष चौक - रोडे चौक - राणी लक्ष्मीबाई टॉवर मार्गे श्री हनुमान मंदिर (मोंढा मार्केट) येथे रॅलीचा समारोप होणार आहे. भाजप-शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व आघाड्यांचे प्रमुख, संस्थांचे पदाधिकारी तसेच सावरकर प्रेमी नागरिक आदींनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे पाटील, शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी केले आहे.
••••


-----------------------------------------------------


Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू


Click:● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण










Video news 




Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*




Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*




Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*




Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?