पत्रकार प्रा. संतोष कुलकर्णी नांदेड यांचा विशेष ब्लॉग >>>>>प्रामाणिक मैत्री जपणारे व्यक्तिमत्व:-पत्रकार अनंत कुलकर्णी

 प्रामाणिक  मैत्री  जपणारे व्यक्तिमत्व:-पत्रकार अनंत कुलकर्णी

......................................................   " "मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना

    त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना

 वाहतांना भार त्यांचा जाहले गणगोत त्यांचे

    कोणते नाते कळेना बांधले आयुष्यभराचे..."


 मैत्री प्रामाणिकपणे जपणारे आमचे पत्रकार मित्र अनंत कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे. मराठवाड्यातील जनतेचे मुखपत्र असलेल्या लोकप्रिय दैनिक लोकप्रभाचे उपसंपादक  अनंत कुलकर्णी  यांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्या लेखणीमुळे अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लागले आहेत. अशा समाज हितासाठी सतत काम करणाऱ्या हरहुन्नरी पञकार अनंत कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे.त्या  निमित्ताने  दोन शब्द ........

.....................


 अनंत कुलकर्णी हे संघर्षातून तावूनसुलाखून पुढे आलेले व्यक्तिमत्त्व सुरुवातीच्या काळामध्ये पडेल ते काम त्यांनी केले व आपल्या सुस्वाभावामुळे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसे जोडली. ते सध्या परळी  शहरात  वीस वर्षांपासून   पत्रकारिता  करत आहेत . या माध्यमातून  अनेक  विषयावर  लिखाण  केले आहे . या लिखाणातून  अनेकांना  बातमीतून  न्याय  मिळत  गेला . त्या  काळी पत्रकारिता  करणे  खुप  अवघड  होते . सत्य  बातमी  छापली  तर लगेच   फोन यायचे. एखादी बातमी छापू नका म्हणून वैयक्तिक दडपण आणण्यासाठी प्रयत्न केले जायचे. तरीही  पत्रकार अनंत कुलकर्णी  यांनी  मनामध्ये यत्किंचितही  भीती  न  बाळगता  लिखाण  सूरूच  ठेवले. 

      अनंत कुलकर्णी यांनी नांवाप्रमाणेच अनंत अडचणींवर मात करत आपल्या जीवनाचा प्रवास करत आहेत. अनंत कुलकर्णी हे मुळचे अंबाजोगाईचे रहिवासी. परंतु परळी येथे आजीकडे प्रथम पासुनच राहत असल्याने ते परळीतच स्थायिक झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी  अंबाजोगाई येथे त्यांनी एका हाॅटेलमध्ये वेटरचे काम केले. वेटरचे काम वर्षभर केल्यानंतर अंबाजोगाई  येथेच  जाजु एजन्सीमध्ये सकाळी सकाळी  पेपर वाटपाचे काम केले .पेपर वाटपाचे काम करत असताना त्यांना दररोज पेपर वाचण्यात येत असल्यामुळे मनोमन पञकार होण्याची ईच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. कांही दिवस हे काम केल्यावर अंबाजोगाई येथे एका दुकानात काम केले. मात्र तेथे मन लागत नव्हते. त्यामुळे मग त्यांनी थेट पुणे गाठले. पुणे एका नामांकित कंपनीत नोकरी केली. परंतु तेथेही मन लागत नव्हते. त्यामुळे परत ते अंबाजोगाईत आले. येथे वडिलांच्या व्यवसायात मदत करत होते. त्यातच ते परळी येथे आपल्या आजीकडे कायम राहण्यासाठी आले. सुरुवातीपासूनच जनसंपर्काची व माणसे जोडण्याची आवड असल्यामुळे, पञकार होण्याची ईच्छाशक्ती मनात असल्याने  परळीतही त्यांनी पेपर वाटपाचे काम केले. या दरम्यान त्यांची जेष्ठ पत्रकार उत्तमजी नागापुरे  यांच्याशी ओळख झाली.कुलकर्णी यांनी दैनिकांमध्ये पत्रकार होण्याची ईच्छा नागापुरे यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर नागापुरे यांनी त्यांना अंबाजोगाई येथील विवेकसिंधु या वृत्तपत्रात काम करण्यास सांगुन, तसे संपादकास बोलले. कुलकर्णी यांनी   नंतर अंबाजोगाई येथे जाऊन त्यांनी  पत्रकार  अविनाश मुडेगांवकर यांची भेट घेऊन परळीत पत्रकार म्हणुन काम करण्याची ईच्छा व्यक्त केली असता मुडेगावकर यांनी लगेच परळीत पत्रकार म्हणुन काम करण्यास सांगितले. तेव्हा पासुन ते  पत्रकार म्हणुन काम करत असुन, नंतरच्या काळात त्यांचा अनेक राजकीय नेत्यांशी संपर्क आला. नंतर त्यांनी सोलापुर संचार, मराठवाडा साथी इत्यादी दैनिकात काम केले. यादरम्यान जेष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय दै. झुंजार नेता चे परळी तालुका प्रतिनिधी दहा  वर्ष काम केले. नंतर  त्यांनी  झुंजार  नेता  सोडून  नामांकित  लोकप्रिय  दिव्य  लोकप्रभा  या वृत्तपत्रात  उपसंपादक  म्हणून  काम करत आहेत सकारात्मक पत्रकारितेमध्ये बीड जिल्ह्यामध्ये ज्यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते असे  संपादक  संतोष  मानुरकर  यांच्या मार्गदर्शनाखाली  उपसंपादक म्हणुन यशस्वीपणे काम करत आहेत. 

Click-_*प्रा.प्रवीण फुटके यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>> ■ *अनंत अडचणींवर मात करणारे अनंत कुलकर्णी*

" दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा." कवी अनंत राऊत यांच्या या कवितेतील ओळीमध्ये प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःखामध्ये आपले मन मोकळे करण्यासाठी एक हक्काचा मित्र हवा असतो. त्याचप्रमाणे अनंत कुलकर्णी यांचे नाते  मित्रांबरोबर आहे. ना.धनंजय मुंडे यांचा जिव्हाळा व आशिर्वाद त्यांना मिळाला आहे.

 पत्रकारिता करत असतांना त्यांनी  शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव काम करण्यासाठी  आपली  वेगळी  ओळख  निर्माण  केली परळी शहरातील  वीर भद्रेशवर प्राथमिक  विघालयाचे   मुख्याध्यापक  मधुकर  गिरवलकर  सर यांनी  लावण्याई  पब्लिक  स्कूल  अनंत कुलकर्णी  यांना चालविण्यास  सांगितले.  आणि  या शाळेचा सर्व  कारभार व  अध्यक्षपद  त्यांच्याकडे देण्यात  आले.  सध्या  ही लावण्याई  पब्लिक  स्कूल  अल्पावधीत   नावारूपाला   आली आहे.  भविष्यात  लावण्याई पब्लिक  स्कुल  शिक्षण  क्षेञात  नक्कीच  यशस्वी होईल अशी शुभेच्छा  देतो. त्यांच्या सकारात्मक पत्रकारितेमुळे कष्टकऱ्यांचे व गोरगरिबांचे महत्वाचे प्रश्न सोडविण्याचे बळ त्यांना वैद्यनाथ प्रभू देवो.  

 

                       ✍️प्रा.  संतोष कुलकर्णी 

                                   नांदेड

-------------------------------------------------------



-----------------------------------------------------

●अधिक बातम्या वाचा व पहा●

-------------------------------------------------------

Click-_*प्रा. संतोष कुलकर्णी, नांदेड यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>> ■ *प्रामाणिक मैत्री जपणारे व्यक्तिमत्व: अनंत कुलकर्णी*

Click-_*प्रा.प्रवीण फुटके यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>> ■ *अनंत अडचणींवर मात करणारे अनंत कुलकर्णी*

Click-■ *१ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्य सेनानी कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मारक लोकार्पण सोहळा*

Click-■ *उद्याची सुट्टी परवा: गुरुवार (दि.२८) ऐवजी शुक्रवार दि.२९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी*

Click- *वाचा : ✍️ चंद्रशेखर फुटके यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>>>>> ● *जनता द्यायची मनातून सन्मान: असे होते आदर्श नेतृत्व कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे*

Click-● _*वाचा:- ✍️ सौ. अपर्णा हृषिकेश नेरलकर, नांदेड यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>>>>>>>> ♦️ *आमचे कल्पवृक्ष : स्वर्गीय अंबादास देशपांडे*

Click-■ *3 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील परळीत*

Click- ■ *परळी तालुक्यातही शेतात लागवड केलेल्या गांजावर छापा*

Click-■ *सरत्या आर्थिक वर्षात संस्थेस 46.37 लाखांचा नफा : प्रा. गंगाधर शेळके*

Click:■ *ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट*

Click- ● *परळीत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा*

Click-● *पिकांच्या नैसर्गिक नुकसानाबाबत तक्रारीसाठी विमा कंपनीकडे अशी करा तक्रार*





Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*

Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*

Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*

Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*

Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*

Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*

Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*



Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार