१०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण.
पाणी नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य : प्रसाद देशमुख
परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)..
कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ‘जागतिक पाणी दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवारी (ता.२३) राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष प्रसाद देशमुख होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. विवेकानंद कवडे उपस्थित होते.
प्रा. विवेकानंद कवडे यांनी आपल्या मार्गदर्शनात पाण्याच्या मर्यादित उपलब्धतेकडे लक्ष वेधले. पृथ्वीवर विपुल प्रमाणात पाणी असले तरी त्यापैकी केवळ ०.३ टक्के पाणीच मानवासाठी वापरण्यायोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पिण्यायोग्य पाण्याचे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच पाणी पिण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करत शुद्ध पाण्याच्या वापरातून आरोग्य कसे चांगले राखता येते, यावरही त्यांनी सविस्तर माहिती दिली.यावेळी त्यांनी पाण्याचे प्रदूषण टाळण्याचे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन विद्यार्थिनींना केले.अध्यक्षीय समारोपात प्रसाद देशमुख यांनी भविष्यातील पाणीटंचाईबाबत इशारा देत सांगितले की, “येणाऱ्या काळात पाण्याचे योग्य नियोजन करूनच दुष्काळावर मात करता येईल. गोड्या पाण्याचे साठे वाढवण्यासाठी मोठ्या क्षमतेचे तलाव उभारणे ही काळाची गरज आहे.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वर्षा मुंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संगीता कचरे यांनी मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा