सुसाईड नोटमध्ये अन्यायाचा पाढा....

इमेज
प्रेम प्रकरणातून चोर ठरविले; बदनामीमुळे तरुणाने जीवन संपविले प्रेम प्रकरणाच्या रागातून एका २३ वर्षीय तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण करणे आणि त्यानंतर त्याला मचोरफ म्हणून बदनाम करणे, या मानसिक छळाला कंटाळून तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ज्ञानेश्वर कोकाटे (२३, रा. मांजरसुंबा) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरचे शेजारच्या गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. याची कुणकुण लागताच तरुणीच्या नातेवाइकांनी ज्ञानेश् बरला गाठले. त्याला संबंधित गावात बोलावून त्याची दुचाकी आणि मोबाईल काढून घेतला. त्यानंतर चार जणांनी त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याला मचोरफ ठरवून सर्वत्र त्याची बदनामी केली. या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे खचलेल्या ज्ञानेश्वरने धुळे-सोलापूर महामार्गावरील एका टायर पंक्चरच्या दुकानात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. पोलिस प्रशासन काय म्हणते ? मृताच्या सुसाईड नोट आणि नातेवाइकांच्या तक्रारीवरून नेकनूर पोलिस ठाण्यात चार आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृ...

बीड जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपची सत्ता, हेच आपले स्वप्न....

 मातृत्वाच्या भावनेतून मी तुमची सेवक म्हणून काम करतेय ; सर्व सामान्य, गोरगरीबांची कामे करताना कायम पाठिशी राहील




ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते अंबाजोगाईत जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उदघाटन





बीड जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपची सत्ता, हेच आपले स्वप्न

अंबाजोगाई दि. २८..

बीड हा माझा जिल्हा आहे. या जिल्ह्यावर माझे विशेष प्रेम आहे. 'आईची माया दाईला येत नसते' या पद्धतीने या जिल्ह्याच्या विकासासाठी आपली सदैव तळमळ राहिली आहे आणि राहणार आहे. मी तुमची सेवक म्हणून काम करणार आहे, यात मातृत्वाची भावना देखील आहे. मंत्री असताना मी यापूर्वीही अंबाजोगाईत जनतेच्या कामांसाठी कार्यालय सुरू केले होते.त्याच प्रथेला अनुसरून आज अंबाजोगाई येथे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. हे कार्यालय सर्वसामान्य जनतेला विनासायास व विनाकष्ट जिथल्या तिथे त्यांची कामे होण्यासाठी कार्यरत राहील अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे दिली. 

      शहरातील प्रशांत नगर येथे सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांसमोर त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, गेवराईच्या नगराध्यक्षा गीता भाभी पवार ,युवा नेते अक्षय मुंदडा, बालासाहेब दोडतले, संतोष हंगे, सलीम जहांगीर, आदित्य सारडा, युद्धजित पंडित, माधव  निर्मळ, गणेश कराड आदींसह भाजपाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी,मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. 


 *प्रत्येकाची कामे व्हावी यासाठी हे कार्यालय* 

----------------------

यावेळी बोलताना ना.पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की,जनतेची सर्व कामे जिथल्या तिथे पार पाडावी यासाठी एक सुसज्ज अशी यंत्रणा या माध्यमातून उभी करण्याचा आपला प्रयत्न आहे. मला भेटण्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लोकांचा मोठा जनसमुदाय असतो. यामध्ये सामान्य माणसाला भेटताना एकाच वेळी गर्दी झाल्याने धावपळ होते व कामेही नीट करता येत नाहीत. याला कुठेतरी शिस्त लागली पाहिजे व कामांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. या दृष्टीकनातून आपण संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून एक सशक्त व सर्व उपयोगी अशी यंत्रणा उभी करत आहोत. या अनुषंगाने अंबाजोगाई येथील हे संपर्क कार्यालय जनतेची छोटी-मोठी सर्व कामे या ठिकाणावरून करणार आहे.लवकरच बीड येथेही अशाच पद्धतीचे संपर्क कार्यालय व जनतेच्या कामांसाठीची यंत्रणा आपण उभी करणार आहोत. त्याचप्रमाणे अन्य तालुक्यांच्या ठिकाणीही संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अशी यंत्रणा उभी करण्याचा आपला मनोदय आहे. 


* मी तुमची सेवक*

----------------

आपण सदा सर्वकाळ जनतेसाठी उपलब्ध असतो. परंतु विरोधकांनी कधीकाळी याच गोष्टीचा मुद्दा बनवत माझ्यावर टिका केली, नावे ठेवली आहेत. मात्र सर्वांना माहीत आहे की आपण सदैव जनतेच्या कामांसाठी उपलब्ध असतो. मुंबई असो किंवा महाराष्ट्रभरात सर्वत्र फिरत असताना प्रत्येक ठिकाणी आपण जनता दरबार व जनतेची कामे करण्यातच व्यस्त असतो. यासाठीच माझे जीवन आहे. माझ्या जीवनात देवधर्म आणि जनता पूजा याशिवाय दुसरे काहीही नाही. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या विचारावर वाटचाल करत असताना त्यांच्याच पद्धतीने काम करण्याचा सदैव आपण प्रयत्न केला आहे. मुंबई असो किंवा इतरत्र आपण  देवपूजा झाल्यानंतर पहिल्यांदा लोकांच्या भेटीगाठी घेतो त्यानंतरच अन्न सेवन करतो. भेटणाऱ्यांचा लोंढा भरपूर असल्याने यामध्ये प्रत्येकाची व्यवस्थित भेट होणे.प्रत्येकाचा प्रश्न.प्रत्येकाची समस्या नीट समजावून घेणे आवश्यक ठरते. यासाठी विशिष्ट शिस्तबद्ध यंत्रणा आपण राबवत आहोत आणि गेल्या काही दिवसात ही शिस्त व याचा चांगला परिणामही दिसून येत आहे. जनतेची कामे होणे हे शेवटी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठीच ही कार्यालये कार्यरत राहतील अशी ग्वाही यावेळी पंकजाताई मुंडे यांनी दिली. 


*बीड जिल्ह्यात शत प्रतिशत आपली सत्ता... हेच आपले स्वप्न* 

-------------------

   यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की.लोकसभेला आपला झालेला पराभव जनतेच्या मनाला लागलेला आहे. या पराभवाने खचून जाऊन आपल्या काही बांधवांनी स्वतःचे जीवही गमावले आहेत. एवढे निसिम व निरपेक्ष प्रेम जनतेने आपल्या नेतृत्वावर केलेले आहे. त्यामुळे हे नेतृत्व जनतेसाठीच समर्पित असून बीड जिल्ह्यात आपला खासदार आणि सहाच्या सहा आमदार आपलेच होते. हेच यश पुन्हा एकदा आपल्याला निर्माण करून दाखवावे लागेल.. बीड जिल्ह्यात आपल्याला शतप्रतिशत यश मिळवायचे आहे. हे आपले स्वप्न आह. एखादे स्वप्न आपण बघतो आणि ते पूर्ण होत नाही असे होणार नाही. कारण आपण जी स्वप्न बघितली ती सर्वसामान्य जनता आणि या बीड जिल्ह्यासाठी बघितलेली आहेत.ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनता जनार्दन आणि ईश्वर निश्चितच आशीर्वाद देणार असल्याची आपल्याला खात्री आहे. बीड जिल्ह्यात येणाऱ्या काळात शतप्रतिशत आपला विजय व्हावा यासाठी  ठिकठिकाणी निर्माण होणारी आपली संपर्क कार्यालय मोठं योगदान देतील असा आपल्याला विश्वास आहे. त्या दृष्टिकोनातून सशक्त व सुसज्ज अशी या कार्यालयाची यंत्रणा आपण करत आहोत.संपूर्ण बीड जिल्ह्यात आपलीच सत्ता येण्यासाठी सर्वांनी कामाला लागले पाहिजे असे आवाहन यावेळी पंकजाताई मुंडे यांनी केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!