पोस्ट्स

इमेज
  गंगाबाई कराळे यांचे निधन परळी/प्रतिनिधी - गणेशपार-सावता महाराज मंदिर परिसरातील ज्येष्ठ महिला, माजी नगरसेवक बालासाहेब कराळे यांच्या मातोश्री गंगाबाई एकनाथराव कराळे (वय ९०) यांचे शुक्रवारी (२० फेब्रुवारी) सकाळी १० च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ च्या सुमारास परळीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे, दीर, बहीण असा मोठा परिवार आहे.

नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची विविध शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती....

इमेज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती परळीत उत्साहात साजरी नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची विविध शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती  छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांच्या वाटचालीतूनच जीवनाचे कल्याण –सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ ,प्रतिनिधी.....         हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परळी शहरात अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली. परळी शहरातील विविध शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमांना नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी उपस्थिती लावत छत्रपती शिवरायांना  वंदन केले. छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांच्या वाटचालीतूनच जीवनाचे कल्याण असल्याची भावना ठिकठिकाणी मनोगत व्यक्त करताना त्यांनी व्यक्त केली.       हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सजावट करण्यात आली होती. या ठिकाणी आयोजित ध्वजारोहण व अभिवादन कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई ब...
इमेज
  बलोपासना करून छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा हीच खरी शिवजयंती  ; दत्ताप्पा ईटके गुरुजी परळी वैजनाथ  बलोपासना करून छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा हीच खरी शिवजयंती असल्याचे  प्रतिपादन हनुमान व्यायाम शाळेचे मुख्य मार्गदर्शक दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी हनुमान व्यायाम शाळेत आयोजित शिवजयंती कार्यक्रमात केले. छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती श्री हनुमान व्यायाम शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बोलताना हनुमान व्यायाम शाळेचे मुख्य मार्गदर्शक दत्ताप्पा ईटके गुरुजी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कणखर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्यात प्रत्येक जाती धर्माचे मावळे सामील होते. आजचा युवक बलोपासना सोडून भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. मात्र सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती आहे.  शिवजयंती कार्यक्रमात प्रथम शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन  हनुमान व्यायाम शाळेचे मुख्य मार्गदर्शक दत्ताप्पा ईटके गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हनुमान व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात महाराजांना सलामी दिली.  यावेळी हनुमान व्या...
इमेज
छत्रपती शिवरायांकडे 'चारित्र्य' आणि 'निश्चय' ही प्रभावी शस्त्रे होती : प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे लिंबा येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव लिंबा (प्रतिनिधी): "शिवजयंती म्हणजे केवळ ढोल-ताशांचा गजर नव्हे, तर महाराजांचे चारित्र्य आणि विचारांचे आपल्या वर्तनात केलेले सिंचन होय. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या शिवरायांकडे 'चारित्र्य' आणि 'निश्चय' ही दोन प्रभावी शस्त्रे होती, तीच शस्त्रे आजच्या तरुणाईने अंगीकारायला हवीत," असे रोखठोक प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते व सिने-नाट्य दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी केले. शिवशंभो मित्र मंडळ, लिंबा तर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात ' छत्रपती शिवराय: आजच्या तरुणाईचा आदर्श' या विषयावर ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला सरपंच विष्णू चव्हाण, जि.प. सदस्य मदनराव भोसले, पं.स. सदस्य भगवानराव दुगाने, नारायणराव अरबाड, शिवाजीराव हरकळ, सुभाषराव हरकळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सू...
इमेज
'अंकुर मानवतेचा' बालनाट्यातील बालकलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने छत्रपती संभाजीनगर:प्रतिनिधी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित २२ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत, सुंदरेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (गुंज) संचलित आयुष अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, कुं. पिंपळगाव च्या बालचमूंनी आपल्या दमदार अभिनयाने रंगमंच गाजवला.छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही स्पर्धा सुरू आहे. लेखक हरिदास घुंगासे यांच्या लेखणीतून उतरलेले हे नाटक मोबाईलच्या आभासी जगात हरवलेली मुले आणि कचरा वेचून जगणाऱ्या अनाथ मुलाची जगण्याची जिद्द यातील संघर्ष प्रभावीपणे मांडते. मानवतेचा खरा अंकुर कसा फुलतो, याचे वास्तववादी दर्शन या नाटकातून घडले. दिग्दर्शक नंदू वाघमारे यांच्या कल्पकतेने विराज दायमा, कार्तिक बहिरे, आयुष घुंगासे, आदिती खडके, ईश्वरी ताठे, दर्शना डोईफोडे आणि तनवी सोळंके या चिमुकल्यांनी एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.  नाटकाच्या यशात तांत्रिक बाजू सांभाळणारे रघुनाथ ताठे, सीमा ताठे तसेच मनीषा घुंगासे, किसन भोईटे, पवन दशरथ, काजल बल्लय्या आण...
इमेज
  जवळा फकीर येथे 28 फेब्रुवारी रोजी दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद  परळी (प्रतिनिधी)  ज्ञानालंकार धम्म संस्कार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जवळा फकीर,ता.धारूर येथे दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक भदन्त पय्यातीस्स महाथेरो यांनी केले आहे.      मृगदायवन महाविहार सारनाथ पार्क जवळा फकीर तालुका धारुर येथे शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता या धम्म परिषदेचे उद्घाटन डॉ.प्रा.खेमधम्मो,मुळावा यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी डॉ.भदन्त उपगुप्त महाथेरो,पूर्णा, ध्वजारोहण डॉ.प्रा.भदन्त एम.सत्यपाल महाथेरो छत्रपती संभाजी नगर, प्रमुख अतिथी पु.भदन्त डॉ.इंदवंश महाथेरो,कुशीनगर, उत्तर प्रदेश, भदंत मुदितानंद महाथेरो,परभणी,भदन्त पय्याबोधी थेरो, नांदेड, भदंत पय्यानंद थेरो लातुर यांची उपस्थिती असणार आहे.    याबरोबरच भदन्त धम्मसार थेरो किल्लारी, भदंत सुभूती थेरो नांदेड, भदंत धम्मशील थेरो बीड, भदंत नागसेन बोधी उदगीर,आदी भन्ते व बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोट...
इमेज
शिवरायांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे होते- रानबा गायकवाड  परळी प्रतिनिधी.           रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात सर्व जाती धर्मांचे मावळे होते ,सैनिक होते असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक भीमयुगकार रानबा गायकवाड यांनी केले. ते परळी तालुक्यातील मौजे इंदपवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवरायांच्या 396 व्या शिवजयंती उत्सवात बोलत होते.       इंदापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. शालुबाई मुंडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाणे, पत्रकार विकास वाघमारे, माजी सरपंच मोहन मुंडे, ह. भ. प. बापू महाराज तसेच निवृत्त शिक्षक भोसले सर, जे.के चौधरी सर ,सतीश मुंडे, उमेश रोडे, राम मुंडे, सचिन मुंडे, विशाल चाटे, पप्पू रोडे आदी उपस्थित होते.      यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ...
इमेज
कै.सौ.केराबाई अंबादास मुंडे यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम ;विठ्ठल महाराज (उखळीकर), साध्वी सोनालीताई करपे यांचे कीर्तन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....     कै.सौ. केराबाई अंबादास मुंडे यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम शुक्रवार दि. 20/02/ 2026 रोजी आयोजित आला असून यानिमित्त ह भ प  विठ्ठल महाराज (उखळीकर), ह भ प साध्वी सोनालीताई करपे यांचे कीर्तन होणार आहे.      कै.सौ. केराबाई अंबादास मुंडे यांना रविवार, दिनांक 08/02/2026 रोजी रोजी देवाज्ञा  झाली. त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम शुक्रवार दि. 20/02/ 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने हनुमान मंदिर, इंदपवाडी, ता. परळी वै. जि. बीड येथे शनिवार, दि. 21/02/2026 रोजी दुपारी 12 ते 2 वा.ह.भ.प. साध्वी सोनालीताई करपे (चकलवा) यांचे किर्तन होईल. रात्री 8 ते 10 वा.ह.भ.प.विठ्ठल महाराज (उखळीकर) यांचे किर्तन होईल. किर्तनास व भोजनास उपस्थित रहावे असे आवाहन अंबादास नारायण मुंडे, दत्तात्रय अंबादास मुंडे, श्रीधर अंबादास मुंडे यांनी केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....