छत्रपती शिवरायांकडे 'चारित्र्य' आणि 'निश्चय' ही प्रभावी शस्त्रे होती : प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे





लिंबा येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव

लिंबा (प्रतिनिधी):

"शिवजयंती म्हणजे केवळ ढोल-ताशांचा गजर नव्हे, तर महाराजांचे चारित्र्य आणि विचारांचे आपल्या वर्तनात केलेले सिंचन होय. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या शिवरायांकडे 'चारित्र्य' आणि 'निश्चय' ही दोन प्रभावी शस्त्रे होती, तीच शस्त्रे आजच्या तरुणाईने अंगीकारायला हवीत," असे रोखठोक प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते व सिने-नाट्य दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी केले.

शिवशंभो मित्र मंडळ, लिंबा तर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात ' छत्रपती शिवराय: आजच्या तरुणाईचा आदर्श' या विषयावर ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्याला सरपंच विष्णू चव्हाण, जि.प. सदस्य मदनराव भोसले, पं.स. सदस्य भगवानराव दुगाने, नारायणराव अरबाड, शिवाजीराव हरकळ, सुभाषराव हरकळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मदन इदगे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पराक्रम टोम्पे, बाबाजी कणसे,जयंती समिती अध्यक्ष गजानन मारुती चव्हाण,अनिल  झाटे,नामदेव  झाटे सर, सार्थक टोम्पे, विशाल कणसे, संजय झाटे, उमेश साखरे, सोमेश्वर कदम, पवन दुगाने, ऋषिकेश इदगे व शिवशंभू मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार