बलोपासना करून छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा हीच खरी शिवजयंती  ; दत्ताप्पा ईटके गुरुजी

परळी वैजनाथ 

बलोपासना करून छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा हीच खरी शिवजयंती असल्याचे  प्रतिपादन हनुमान व्यायाम शाळेचे मुख्य मार्गदर्शक दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी हनुमान व्यायाम शाळेत आयोजित शिवजयंती कार्यक्रमात केले.


छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती श्री हनुमान व्यायाम शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बोलताना हनुमान व्यायाम शाळेचे मुख्य मार्गदर्शक दत्ताप्पा ईटके गुरुजी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कणखर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्यात प्रत्येक जाती धर्माचे मावळे सामील होते. आजचा युवक बलोपासना सोडून भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. मात्र सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती आहे. 


शिवजयंती कार्यक्रमात प्रथम शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन  हनुमान व्यायाम शाळेचे मुख्य मार्गदर्शक दत्ताप्पा ईटके गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हनुमान व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात महाराजांना सलामी दिली. 

यावेळी हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष वैजनाथ ईटके, वस्ताद दिगंबर नांगराळे, कृष्णा बागवले, अवधूत आयचीत, कार्तिक गायकवाड, नागेश मेंगले, कांबळे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार