नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची विविध शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती....

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती परळीत उत्साहात साजरी





नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची विविध शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती




 छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांच्या वाटचालीतूनच जीवनाचे कल्याण –सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी

परळी वैजनाथ ,प्रतिनिधी.....

        हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परळी शहरात अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली. परळी शहरातील विविध शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमांना नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी उपस्थिती लावत छत्रपती शिवरायांना  वंदन केले. छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांच्या वाटचालीतूनच जीवनाचे कल्याण असल्याची भावना ठिकठिकाणी मनोगत व्यक्त करताना त्यांनी व्यक्त केली.

      हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सजावट करण्यात आली होती. या ठिकाणी आयोजित ध्वजारोहण व अभिवादन कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी उपस्थित रहात छत्रपती शिवरायांना वंदन केले. त्याचप्रमाणे शहरातील सुभाष चौक शिवजयंती उत्सव समिती, चाळीस फुटी रोड शिवजयंती उत्सव समिती, अयोध्या नगर शिवजयंती उत्सव समिती, आनंदनगर पद्मावती विभाग शिवजयंती उत्सव समिती आदी विविध कार्यक्रमांना उपस्थित रहात छत्रपती शिवरायांना वंदन केले. याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई  बाजीराव धर्माधिकारी यांनी छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा, कीर्तीचा आणि पराक्रमाचा संदर्भ देत शिवरायांचे चरित्र प्रत्येकासाठी अनुकरणीय आणि जीवनाचे कल्याण करून घेण्याचे एकमेव साधन असल्याचे सांगितले. छत्रपती शिवरायांच्या इतिहासातूनच आणि त्यांच्या दिव्य विचारातूनच आपल्या जीवनाचे निश्चितपणाने कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या विचारावर निष्ठा आणि श्रद्धा ठेवून आपण वाटचाल करण्याचा निश्चय केला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. परळी वैजनाथ शहरातील विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना नगरसेवक, पदाधिकारी, त्या त्या भागातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या