नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

'अंकुर मानवतेचा' बालनाट्यातील बालकलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने



छत्रपती संभाजीनगर:प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित २२ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत, सुंदरेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (गुंज) संचलित आयुष अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, कुं. पिंपळगाव च्या बालचमूंनी आपल्या दमदार अभिनयाने रंगमंच गाजवला.छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही स्पर्धा सुरू आहे.

लेखक हरिदास घुंगासे यांच्या लेखणीतून उतरलेले हे नाटक मोबाईलच्या आभासी जगात हरवलेली मुले आणि कचरा वेचून जगणाऱ्या अनाथ मुलाची जगण्याची जिद्द यातील संघर्ष प्रभावीपणे मांडते. मानवतेचा खरा अंकुर कसा फुलतो, याचे वास्तववादी दर्शन या नाटकातून घडले. दिग्दर्शक नंदू वाघमारे यांच्या कल्पकतेने विराज दायमा, कार्तिक बहिरे, आयुष घुंगासे, आदिती खडके, ईश्वरी ताठे, दर्शना डोईफोडे आणि तनवी सोळंके या चिमुकल्यांनी एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. 

नाटकाच्या यशात तांत्रिक बाजू सांभाळणारे रघुनाथ ताठे, सीमा ताठे तसेच मनीषा घुंगासे, किसन भोईटे, पवन दशरथ, काजल बल्लय्या आणि सपना बलैया यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामीण भागातील या कलाकारांना राज्य स्तरावर मोठी झेप घेता आली.जालना जिल्ह्याच्या आणि कुं. पिंपळगावच्या या छोट्या सुपरस्टार्सचे सर्वत्र कौतुक होत आहे.रंगकर्मी डॉ.राजू सोनवणे आणि सिनेनाट्य लेखक दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी बालकलावंतांना मार्गदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या