पोस्ट्स

ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांच्या ‘धडपड’ या लेख संग्रहाचे प्रकाशन

इमेज
‘धडपड’ हा लेखसंग्रह पत्रकारिता क्षेत्रातील नव्या पिढीसाठी मार्गदर्शक-प्रशांत जोशी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांच्या ‘धडपड’ या लेख संग्रहाचे  प्रकाशन परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः-  ‘धडपड’ हा लेखसंग्रह पत्रकारिता क्षेत्रातील नव्या पिढीसाठी उपयुक्त तर आहेतच शिवाय तो मार्गदर्शकही आहे असे प्रतिपादन माजीमंत्री आमदार धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांनी केले.          परळीतील शिक्षक ,ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक लक्ष्मण वाकडे यांच्या ‘धडपड’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी (ता.२१) येथील नेहरू चौक परिसरातील हनुमान कॉम्प्लेक्स येथे श्री जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार संजय खाकरे, जगदीश शिंदे, न्यू हायस्कूलचे पर्यवेक्षक दाजीबा नखाते, ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब मुंडे, सुर्यकांत कातकडे, अमोल कांबळे, राहुल ताटे, सचिन काळम,  पत्रकार दत्ता शिवगण, मोहन साखरे, माऊली होळंबे, रामदास कराड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रशांत जोशी यावेळी म्हणाले की, गेली चार दशके परळीच्या पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले लक्ष्मण वाकडे ...

लाखो विद्यार्थी आणि मुस्लिम समाजातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय मतपेटीच्या राजकारणासाठी

इमेज
जमात-ए-इस्लामी हिंद, प्रदेश अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी मुसलमानांसाठी ५ टक्के आरक्षण रद्द केल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली लाखो विद्यार्थी आणि मुस्लिम समाजातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय मतपेटीच्या राजकारणासाठी परळी प्रतिनिधी : जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी राज्यात मुसलमानांसाठी असलेले ५ टक्के आरक्षण औपचारिकरित्या रद्द केल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मौलाना इलियास खान म्हणाले की सरकार आपल्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी कायदेशीर तरतुदींचा आधार घेत असले, तरी एका संवैधानिक लोकशाहीत सर्व नागरिकांसाठी न्याय या तत्त्वाकडे दुर्लक्ष करता येत नाही. लाखो विद्यार्थी आणि मुस्लिम समाजातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय मतपेटीच्या राजकारणासाठी किंवा सूडबुद्धीच्या राजकारणासाठी वापरले जाऊ नयेत. जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष यांनी मुसलमानांच्या शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाबद्दल तसेच त्यांना जाणीवपूर्वक राष्ट्रीय मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणाऱ्या धोरणांबाबत च...
इमेज
काव्या महिला महाविद्यालय अंबाजोगाई  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी  अंबाजोगाई (प्रतिनिधी )  अंबाजोगाई येथील काव्या महिला महाविद्यालय येथील मुलींनी आपल्या कली मधून शिवनेरी किल्ला हा तयार केला   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज काव्या महिला महाविद्यालयाला प्रमुख पाहुणे श्रुती अमोल लोमटे नगरसेविका अंबाजोगाई महाविद्यालयाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित होत्या त्यांनी आज पूर्ण विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांबद्दल पूर्ण माहिती दिलीफार कमी जणांना माहीत असेल म्हणून शेअर करतोय पुढच्या पिढीला पण माहीत करून द्या...  *छत्रपती* एक आख्यायिका का झाले...  शिवाजी महाराजांचे 7 घोडे - 1- मोती 2- विश्वास  3- तुरंगी  4- इंद्रायणी 5- गाजर  6- रणभीर 7- कृष्णा- शेवटच्या काळातील पांढरा घोडा. महाराज राज्याभिषेकांनंतर या वर बसले. शिवाजी महाराज घोड्याचा वापर निर्णायक प्रसंगीच करत असत. छत्रपती शिवरायांचा आहार साधा होता.  संपूर्ण जीवन निर्व्यसनी. मोहिमेच्यावेळी तंबूत झोपणे. दैनंदीन पोशा...

नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची विविध शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती....

इमेज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती परळीत उत्साहात साजरी नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची विविध शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती  छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांच्या वाटचालीतूनच जीवनाचे कल्याण –सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ ,प्रतिनिधी.....         हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परळी शहरात अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली. परळी शहरातील विविध शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमांना नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी उपस्थिती लावत छत्रपती शिवरायांना  वंदन केले. छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांच्या वाटचालीतूनच जीवनाचे कल्याण असल्याची भावना ठिकठिकाणी मनोगत व्यक्त करताना त्यांनी व्यक्त केली.       हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सजावट करण्यात आली होती. या ठिकाणी आयोजित ध्वजारोहण व अभिवादन कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई ब...
इमेज
  बलोपासना करून छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा हीच खरी शिवजयंती  ; दत्ताप्पा ईटके गुरुजी परळी वैजनाथ  बलोपासना करून छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा हीच खरी शिवजयंती असल्याचे  प्रतिपादन हनुमान व्यायाम शाळेचे मुख्य मार्गदर्शक दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी हनुमान व्यायाम शाळेत आयोजित शिवजयंती कार्यक्रमात केले. छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती श्री हनुमान व्यायाम शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बोलताना हनुमान व्यायाम शाळेचे मुख्य मार्गदर्शक दत्ताप्पा ईटके गुरुजी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कणखर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्यात प्रत्येक जाती धर्माचे मावळे सामील होते. आजचा युवक बलोपासना सोडून भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. मात्र सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती आहे.  शिवजयंती कार्यक्रमात प्रथम शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन  हनुमान व्यायाम शाळेचे मुख्य मार्गदर्शक दत्ताप्पा ईटके गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हनुमान व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात महाराजांना सलामी दिली.  यावेळी हनुमान व्या...
इमेज
छत्रपती शिवरायांकडे 'चारित्र्य' आणि 'निश्चय' ही प्रभावी शस्त्रे होती : प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे लिंबा येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव लिंबा (प्रतिनिधी): "शिवजयंती म्हणजे केवळ ढोल-ताशांचा गजर नव्हे, तर महाराजांचे चारित्र्य आणि विचारांचे आपल्या वर्तनात केलेले सिंचन होय. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या शिवरायांकडे 'चारित्र्य' आणि 'निश्चय' ही दोन प्रभावी शस्त्रे होती, तीच शस्त्रे आजच्या तरुणाईने अंगीकारायला हवीत," असे रोखठोक प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते व सिने-नाट्य दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी केले. शिवशंभो मित्र मंडळ, लिंबा तर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात ' छत्रपती शिवराय: आजच्या तरुणाईचा आदर्श' या विषयावर ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला सरपंच विष्णू चव्हाण, जि.प. सदस्य मदनराव भोसले, पं.स. सदस्य भगवानराव दुगाने, नारायणराव अरबाड, शिवाजीराव हरकळ, सुभाषराव हरकळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सू...
इमेज
'अंकुर मानवतेचा' बालनाट्यातील बालकलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने छत्रपती संभाजीनगर:प्रतिनिधी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित २२ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत, सुंदरेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (गुंज) संचलित आयुष अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, कुं. पिंपळगाव च्या बालचमूंनी आपल्या दमदार अभिनयाने रंगमंच गाजवला.छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही स्पर्धा सुरू आहे. लेखक हरिदास घुंगासे यांच्या लेखणीतून उतरलेले हे नाटक मोबाईलच्या आभासी जगात हरवलेली मुले आणि कचरा वेचून जगणाऱ्या अनाथ मुलाची जगण्याची जिद्द यातील संघर्ष प्रभावीपणे मांडते. मानवतेचा खरा अंकुर कसा फुलतो, याचे वास्तववादी दर्शन या नाटकातून घडले. दिग्दर्शक नंदू वाघमारे यांच्या कल्पकतेने विराज दायमा, कार्तिक बहिरे, आयुष घुंगासे, आदिती खडके, ईश्वरी ताठे, दर्शना डोईफोडे आणि तनवी सोळंके या चिमुकल्यांनी एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.  नाटकाच्या यशात तांत्रिक बाजू सांभाळणारे रघुनाथ ताठे, सीमा ताठे तसेच मनीषा घुंगासे, किसन भोईटे, पवन दशरथ, काजल बल्लय्या आण...
इमेज
  जवळा फकीर येथे 28 फेब्रुवारी रोजी दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद  परळी (प्रतिनिधी)  ज्ञानालंकार धम्म संस्कार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जवळा फकीर,ता.धारूर येथे दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक भदन्त पय्यातीस्स महाथेरो यांनी केले आहे.      मृगदायवन महाविहार सारनाथ पार्क जवळा फकीर तालुका धारुर येथे शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता या धम्म परिषदेचे उद्घाटन डॉ.प्रा.खेमधम्मो,मुळावा यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी डॉ.भदन्त उपगुप्त महाथेरो,पूर्णा, ध्वजारोहण डॉ.प्रा.भदन्त एम.सत्यपाल महाथेरो छत्रपती संभाजी नगर, प्रमुख अतिथी पु.भदन्त डॉ.इंदवंश महाथेरो,कुशीनगर, उत्तर प्रदेश, भदंत मुदितानंद महाथेरो,परभणी,भदन्त पय्याबोधी थेरो, नांदेड, भदंत पय्यानंद थेरो लातुर यांची उपस्थिती असणार आहे.    याबरोबरच भदन्त धम्मसार थेरो किल्लारी, भदंत सुभूती थेरो नांदेड, भदंत धम्मशील थेरो बीड, भदंत नागसेन बोधी उदगीर,आदी भन्ते व बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोट...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....