नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांच्या ‘धडपड’ या लेख संग्रहाचे प्रकाशन

‘धडपड’ हा लेखसंग्रह पत्रकारिता क्षेत्रातील नव्या पिढीसाठी मार्गदर्शक-प्रशांत जोशी




ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांच्या ‘धडपड’ या लेख संग्रहाचे  प्रकाशन

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- 

‘धडपड’ हा लेखसंग्रह पत्रकारिता क्षेत्रातील नव्या पिढीसाठी उपयुक्त तर आहेतच शिवाय तो मार्गदर्शकही आहे असे प्रतिपादन माजीमंत्री आमदार धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांनी केले.

         परळीतील शिक्षक ,ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक लक्ष्मण वाकडे यांच्या ‘धडपड’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी (ता.२१) येथील नेहरू चौक परिसरातील हनुमान कॉम्प्लेक्स येथे श्री जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार संजय खाकरे, जगदीश शिंदे, न्यू हायस्कूलचे पर्यवेक्षक दाजीबा नखाते, ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब मुंडे, सुर्यकांत कातकडे, अमोल कांबळे, राहुल ताटे, सचिन काळम,  पत्रकार दत्ता शिवगण, मोहन साखरे, माऊली होळंबे, रामदास कराड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रशांत जोशी यावेळी म्हणाले की, गेली चार दशके परळीच्या पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले लक्ष्मण वाकडे यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून विविध विषयावर लेखन केले आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न वृत्तपत्रात मांडून त्यांना न्याय दिला आहे. वेगळ्या बातम्या व विषय त्यांनी मांडले आहेत. आपल्या कामातून त्यांनी आदर्श उभा केला आहे. अनेक पत्रकार घडवले आहेत असे सांगून  जोशी यांनी परळीचा इतिहास डिजीटल स्वरूपात तयार केला जावा व इथे येणार्‍या पाहुण्यांचे स्वागत इथल्या इतिहासाचे, लेखकांचे पुस्तक देऊन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

      प्रास्ताविक राहुल ताटे यांनी केले. यावेळी संजय खाकरे, बाबासाहेब मुंडे, सुर्यकांत कातकडे यांनी लक्ष्मण वाकडे यांची पत्रकारिता व ग्रंथसंपदा नव्या पिढीसाठी आदर्श आहे असे सांगितले. श्री वाकडे यावेळी बोलताना म्हणाले की, परळीत बातमीदार म्हणून ‘सकाळ’, ’पुढारी’, परळी परिसर यांसह इतर विविध वृत्तपत्रात काम करत असताना मनात फुललेल्या व या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचा ‘धडपड’ या लेख संग्रहात समावेश आहे. हा पहिला भाग असून लवकरच आणखी दोन भाग येणार आहेत असे सांगून यासाठी सहकार्य लाभलेल्यांचे त्यांनी आभार मानले. परळी येथील सुधांशू प्रकाशन संस्थेतर्फे हा लेख संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. प्रकाशन संस्थेतर्फे या लेख संग्रहाची मांडणी करणारे दत्ता शिवगण यांचा यावेळी  जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमोल कांबळे यांनी केले.

      दरम्यान,  वाकडे यांचे हे पंचेवीसावे पुस्तक आहे. विविध बालकुमार कथा संग्रहासह श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळीवरील त्यांची अनेक पुस्तके वाचकप्रिय झाली आहेत. ‘वैद्यनाथाची परळी’ या ग्रंथाच्या सहा आवृत्या व ‘श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळ कथा महात्म्य’ या ग्रंथाच्या तीन आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या