५ एप्रिलपर्यंत स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे नागरिकांना आवाहन
शेतकऱ्याकडून २ हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा....
सिरसाळा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत शेतकऱ्याकडून लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एका शेतकऱ्याचा ऊस वाहतूक करताना इतर काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने सिरसाळा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचारी दत्ता निघूळ यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. मात्र, पैसे स्वीकारताना संशय आल्याने संबंधित कर्मचाऱ्याने लाच स्वीकारली नाही. तरीही लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीने त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यातच संबंधित पोलीस कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा