इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-गुरू पोर्णिमेनिमित्त गुरू चरित्र पारायण सोहळा

 गुरूपोर्णिमे निमित्त गुरू चरित्र पारायण सोहळा



परळी भावसार समाजाचा उपक्रम


परळी / प्रतिनिधी


परळी शहरातील भावसार समाजाच्या वतीने गुरू पोर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरु चरित्र पारायण सोहळा आयोजीत केला असुन या सोहळ्यास दि. 6 जुलै रोजी प्रारंभ झाला असून या सोहळ्याची सांगता दि. 13 जुलै रोजी होणार आहे. या सोहळ्यात श्री गुरू चरित्र पारायण, संगित भजन, गिता पारायण यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.


गुरू पोर्णिमेनिमित्ताने परळी शहरातील श्री दत्त मंदिर भावसार समाज या ठिकाणी आयोजित या सोहळ्यात दैनंदिन कार्यक्रमांत सकाळी 7 ते 9 दरम्यान श्री गुरू चरित्र पारायण सोहळा, सायंकाळी 4 ते 6 संगित भजनाचा कार्यक्रम तर एकादशी निमित्त रविवार दि. 10 जुलै  रोजी सकाळी 10 ते 12 दरम्यान गिता पारायण होणार आहे. सलग सात दिवस श्री संत नरहरी महाराज भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. 13 जुलै रोजी श्री दत्तगुरू यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून निघणार असुन तद्नंतर श्री ह.भ.प. संपत महाराज गित्ते गुरूजी यांचे काल्याचे किर्तन आणि दुपारी 12.39 मि. दत्तगुरूंची महाआरती व नंतर महाप्रसाद होणार आहे. तरी या सोहळ्याचा भाविकांनी व समाज बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन परळी भावसार समाजाचे अध्यक्ष प्रभाकर हजारे, संयोजक गोपाळ कंकाळ व पारायण सोहळा उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा व वाचा:*दुर्दैवी! अंबाजोगाई येथील विद्यार्थ्याचा सोलापूरच्या तलावात बुडून मृत्यू*

क्लिक करा व वाचा:🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*

Click &Read:*रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी*

क्लिक करा व वाचा:🔴*💥 आश्चर्यच!* 💥 ■ *_४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा अवतार' म्हणत पाहायला गाव जमलं_

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन....

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

Click &read:🔸येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!