इमेज
  परळीत सुर्य कोपला! पुढील १५ दिवस पारा ४४ अंशांवर; प्रशासनाकडून 'अलर्ट' जारी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहर आणि परिसरात पुढील १५ दिवसांत उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढणार असून, हवामान प्रामुख्याने उष्ण आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाढत्या उष्णतेचे संभाव्य परिणाम: १. आरोग्यावर परिणाम: अतिउष्णतेमुळे उष्माघात (Heat Stroke), डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि त्वचेचे विकार होण्याचा धोका वाढतो. २. पाणीटंचाई: बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने पाणीसाठ्यात घट होऊन पाणीटंचाई जाणवू शकते. ३. शेतीवर परिणाम: कडाक्याच्या उन्हामुळे पिकांना जादा पाण्याची गरज भासेल आणि जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. नागरिकांसाठी उपाययोजना आणि सल्ले: भरपूर पाणी प्या: तहान नसली तरीही नियमितपणे पाणी प्या. लिंबू सरबत, ताक, आणि लस्सी यांसारख्या पेयांचा वापर वाढवा. वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते ४ या ...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश- पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची माहिती



मुंबई, दि. १३ - राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा तसेच वराह पालन व्यवसायाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयामुळे मुरघास संयंत्रांच्या माध्यमातून वैरण विकासाला चालना मिळणार असून पशुपालकांसाठी स्थिर व परवडणारा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः समूह पातळीवर काम केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन ग्रामीण भागात उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

या निर्णयानुसार आता वैयक्तिक लाभार्थ्यांबरोबरच शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी समूह गट, महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणीकृत असलेली समुदाय आधारित  संसाधन केंद्रे आणि उमेद नोंदणीकृत प्रभाग संघ यांनाही या योजनेत सहभागी होता येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांकडे किमान ५० सदस्य, ५ लाख रुपये भागभांडवल आणि मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण पूर्ण असणे आवश्यक ठेवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेळी/मेंढी/गाय/म्हैस/कुक्कुटपालन यांचा समावेश आहे. आता या निर्णयानुसार वराह पालनाला चालना देण्यासाठी ‘वराह पालन गट वाटप योजना’ समाविष्ट करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ५+१ वराह गट, विमा आणि आवश्यक पायाभूत सुविधा यांचा समावेश असलेला सुमारे २.०८ लाख रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५० टक्के तर अनुसूचित जाती-जमातींना ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेत सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील भूमिहीन, अल्पभूधारक, महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येणार असून महिलांसाठी ५० टक्के तर दिव्यांगांसाठी ५ टक्के आरक्षण लागू राहणार आहे. लाभार्थ्यांना पशुपालनाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य करण्यात आले असून स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली खरेदी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

उद्योजकता विकास योजनेअंतर्गत ४ टक्के व्याज सवलत योजना ही शेळी/मेंढी/गाय/म्हैस/कुक्कुटपालन या पशुपालन व्यवसायाबरोबरच वराह पालन व्यवसायालाही लागू करण्यात आली आहे. यामुळे पशुपालन क्षेत्रात गुंतवणूक वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची अपेक्षा मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....