इमेज
  परळीत सुर्य कोपला! पुढील १५ दिवस पारा ४४ अंशांवर; प्रशासनाकडून 'अलर्ट' जारी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहर आणि परिसरात पुढील १५ दिवसांत उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढणार असून, हवामान प्रामुख्याने उष्ण आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाढत्या उष्णतेचे संभाव्य परिणाम: १. आरोग्यावर परिणाम: अतिउष्णतेमुळे उष्माघात (Heat Stroke), डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि त्वचेचे विकार होण्याचा धोका वाढतो. २. पाणीटंचाई: बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने पाणीसाठ्यात घट होऊन पाणीटंचाई जाणवू शकते. ३. शेतीवर परिणाम: कडाक्याच्या उन्हामुळे पिकांना जादा पाण्याची गरज भासेल आणि जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. नागरिकांसाठी उपाययोजना आणि सल्ले: भरपूर पाणी प्या: तहान नसली तरीही नियमितपणे पाणी प्या. लिंबू सरबत, ताक, आणि लस्सी यांसारख्या पेयांचा वापर वाढवा. वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते ४ या ...

गीता परिवार चा उपक्रम....

 परळीत लहान मुलांसाठी 'उन्हाळी सुट्टी विशेष' संस्कार शिबिराचे आयोजन



परळी वैजनाथ: प्रतिनिधी...

     येथील 'गीता परिवार' आणि 'बचपन प्रायमरी प्ले स्कूल' यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी विशेष उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 'चला शिबिराला बालमित्रांनो!' या संकल्पनेवर आधारित हे शिबीर २२ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.

      मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत आणि त्यांच्या सुट्टीचा सदुपयोग व्हावा, या उद्देशाने हे शिबीर आयोजित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने शंखनाद प्रशिक्षण हे विशेष आकर्षण असणार आहे. याशिवाय रामरक्षा स्तोत्र, योगासने, मैदानी खेळ, निसर्ग सहल, नाटिका व नृत्य आणि गीता पठण असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत. शिबिरात सहभागी मुलांना रोज पौष्टिक अल्पोपहारही दिला जाईल.या शिबिराद्वारे मुलांना श्रीराम जन्मोत्सव, सीता स्वयंवर, राम-सुग्रीव मैत्री आणि श्रीराम राज्याभिषेक अशा विविध प्रसंगांतून प्रभू श्रीरामांचा आदर्श आणि जीवनमूल्ये शिकवली जाणार आहेत. "सत्य, प्रेम, धैर्य धाम। आपले आदर्श श्रीराम।।" हे या शिबिराचे मुख्य सूत्र आहे.

      हे शिबीर वयोगट: ५ ते १५ वर्षे या गटाचे आहे .२२ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत दररोज दुपारी ३:३० ते ६:०० वा. या वेळेत होईल. शिबिरासाठी शुल्क: ३०० रुपये ठेवण्यात आले आहे.बचपन प्रायमरी प्ले स्कूल, कावेरी प्लाझा रोड, हनुमान मंदिर समोर, परळी वै. (जि. बीड). येथे आयोजित या शिबिरात जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांची नावे या शिबिरासाठी नोंदवावीत, असे आवाहन आयोजक सौ. ललिता जाजू, सौ. राजकन्या मंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ७८४१००५३७७ किंवा ९४२३७७७६३० या क्रमांकांवर संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....