परळी वैजनाथमध्ये रुग्णांना नवा "आधार"
प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आरोग्य व्यवस्था. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी एक सकारात्मक स्थिती बघायला मिळाली.
डॉ. मनोज मुंडे व डॉ. प्रणिता मुंडे आघाव यांच्या माणिक नगर भागात झालेल्या आधार हॉस्पिटल व क्रिटीकेअर सेंटरमध्ये गेल्या गेल्या एका फलकावर नजर गेली. तिथे चक्क त्या हॉस्पिटलमध्ये देण्यात येणाऱ्या सेवांचे दरपत्रक / रेटकार्ड लावलेले आहे.
हे रुग्णसेवेत पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने केलेल्या नियमांतील बेसिक आहे. पण, तुम्हांला आजवर आपल्या परळी वैजनाथ परिसरात हे कधी बघायला मिळाले असेल तर नक्की कळवा. कारण त्यांचेही कौतुक झालेच पाहिजे.
माझ्या मते तिथे उपचारांसाठी गेलेल्या रुग्णाला गेल्यागेल्या तपासणी दरांसह आवश्यकतेनुसार पुढील उपचारांचा अंदाज लगेच लावता येतो. सामान्यतः रुग्ण आणि त्याचे नातेवाईक उपचारा दरम्यान कायम बिलाच्या टेन्शनमध्ये असतात की किती बिल येणार? कसे अदा करणार? इथे दरपत्रक असल्यामुळे तो प्रश्न सुरुवातीलाच निकाली निघतो. यासाठी डॉ. मनोज मुंडे व डॉ. प्रणिता मुंडे आघाव हे नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.परळी वैजनाथ येथील सर्व हॉस्पिटलने त्यांचे अनुकरण केले तर नक्कीच हे रुग्णांना दिलासा देणारे एक पाऊल असेल.
डॉ. मनोज संभाजी मुंडे यांचा अल्प परिचय
परळी वैजनाथ येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दीर्घकाळ सेवा देऊन निवृत्त झालेल्या डॉ. संभाजी मुंडे यांचे ते सुपुत्र आहेत. मनोज यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अनुक्रमे नवीन प्राथमिक शाळा व न्यू हायस्कूलमध्ये झाले. पुढे उच्च माध्यमिक शिक्षण प्रवरा नगर येथून घेऊन त्यांनी तत्कालीन अहमदनगर येथे M.B.B.S. पूर्ण केले. त्यानंतर सोलापूर येथे MD. मेडिसिन केले.
पुढे मुंबई येथील प्रतिष्ठित हिंदुजा हॉस्पीटलमध्ये काही वर्षे रुग्णसेवा केली. नंतर इस्लामपूर येथेही ते आरोग्य क्षेत्रात कार्यरत होते. सध्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात कार्यरत आहेत. सोबतच त्यांनी परळी वैजनाथ येथे नुकतेच आधार हॉस्पिटल व क्रिटीकेअर सेंटर सुरू केले आहे.
त्यांच्या अर्धांगिनी तथा येथील प्रसिद्ध उद्योजक तथा नवगण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. मधुकर आघाव सरांच्या कन्या डॉ. प्रणिता मुंडे आघाव M.B.B.S. MD Path ह्या समर्थपणे साथ देत आहेत.
आधार हॉस्पिटलकडून वेळोवेळी योग्य ती रुग्णसेवा घडत राहो ही धन्वंतरी प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना.
जय हिंद 🇮🇳
✍️ अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ
दि. 15 एप्रिल 2026
#जोशींचीतासिका
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा