कै. मुरहरी मानाजी फड यांचे निधन
परळी (प्रतिनिधी )शिक्षण सम्राट रामराजे फड व संभुदेव फड यांचे वडील कै. मुरहरी मानाजी फड खांदगावकर यांचे वार मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी ४ वाजता देवाज्ञा झाली.
गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील कै. मुरहरी मानाजी फड यांना वार मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी ४ वाजता देवाज्ञा झाली वार बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता खांदगाव येथील स्मशान भूमी येथे त्यांचा अंत्यविधी टाळ मृदुंग गजरात करण्यात आला कै.मुरहरी मानाजी फड यांच्या जाण्याने पंचक्रोशीत दुःखाचा डोंगर पसरला असून कै.मुरहरी मानाजी फड हे परभणी व बीड जिल्ह्यात सुप्रसिद्ध होते त्यांचा मनमिळाऊ स्वभाव वारकरी संप्रदायाची एकनिष्ठ असलेले सर्वांशी मनमिळावू असलेले व्यक्तिमत्व आज आपल्यातून देवाज्ञा झाली आहे व त्यांच्या पश्चात दोन मुले मुलगी जावई सुना नातवंडे असा भरगच्च परिवार असून शिक्षण सम्राट रामराजे फड ,संबुदेव फड , सौ.गिरजाबाई काशिनाथ कांगणे यांचे वडील होते. रक्षाविधीचा कार्यक्रम वार गुरुवार दिनांक 16 एप्रिल सकाळी सात वाजता खांदगाव येथील स्मशानभूमी येथे करण्यात येईल फड कुटुंबीयांच्या पश्चात दैनिक सोमेश्वर साथी परिवार सहभागी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा