इमेज
  परळीत सुर्य कोपला! पुढील १५ दिवस पारा ४४ अंशांवर; प्रशासनाकडून 'अलर्ट' जारी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहर आणि परिसरात पुढील १५ दिवसांत उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढणार असून, हवामान प्रामुख्याने उष्ण आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाढत्या उष्णतेचे संभाव्य परिणाम: १. आरोग्यावर परिणाम: अतिउष्णतेमुळे उष्माघात (Heat Stroke), डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि त्वचेचे विकार होण्याचा धोका वाढतो. २. पाणीटंचाई: बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने पाणीसाठ्यात घट होऊन पाणीटंचाई जाणवू शकते. ३. शेतीवर परिणाम: कडाक्याच्या उन्हामुळे पिकांना जादा पाण्याची गरज भासेल आणि जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. नागरिकांसाठी उपाययोजना आणि सल्ले: भरपूर पाणी प्या: तहान नसली तरीही नियमितपणे पाणी प्या. लिंबू सरबत, ताक, आणि लस्सी यांसारख्या पेयांचा वापर वाढवा. वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते ४ या ...

संघटनात्मक फेरबदलाचे संकेत

मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त



बीड: प्रतिनिधी..
     वंचित बहुजन आघाडीने बीड जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या अधिकृत पत्रानुसार, बीड जिल्ह्यातील 'बीड पूर्व' आणि 'बीड पश्चिम' या दोन्ही जिल्हा कार्यकारिणींसह जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर कार्यकारिणी तातडीने बरखास्त करण्यात आल्या आहेत.
       १५ एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण सूचनेमुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकारीन्या बरखास्त करण्यात आले आहेत. या निर्णयाची नोंद बीड पूर्व व पश्चिम जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
संघटनात्मक फेरबदलाचे संकेत
     कार्यकारिणी बरखास्त करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठे फेरबदल आणि नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी हा बदल करण्यात येत आहे. त्यामुळे काम करणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना आता पक्ष कार्यात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....