इमेज
  पोलिसांना आता कडक हेल्मेटसक्ती; विनाहेल्मेट दिसल्यास थेट सेवापुस्तकात होणार नोंद! महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलात शिस्त आणि रस्ते सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. या नव्या निर्णयानुसार आता दुचाकी चालवणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईच नाही, तर त्यांच्या सेवापुस्तकातही तशी नकारात्मक नोंद केली जाणार आहे. गेल्या दशकातील अपघातांची आकडेवारी पाहता दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण ३५ ते ४० टक्के असल्याचे समोर आले असून, खुद्द पोलीस कर्मचाऱ्यांमध्येच हेल्मेट वापराचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. ब्लूमबर्ग फिलिंथ्रॉपीज इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार मुंबई आणि नागपूरमध्ये हेल्मेट वापराचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक असले, तरी उर्वरित महाराष्ट्रातील शहरांत ही संख्या २० टक्क्यांच्याही खाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर मानून प्रशासनाने सर्व पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा अधीक्षक...

चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड

 ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन, आठ दशकांपासूनचा चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड




ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या चिरतरुण आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले या आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी ही माहिती दिली की त्यांची आई आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. आशा भोसलेंचे अवयव निकामी होत गेले, त्यामुळे त्यांचं निधन झालं. आशा भोसले यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या सकाळी ११ ते २ या वेळेत त्या लोअर परळ या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....