'आम आदमी पार्टी'च्या इशाऱ्याची महावितरणने घेतली दखल; परळीतील गणेशपार भागातील डीपीची अखेर दुरुस्ती
परळी वैजनाथ: प्रतिनिधी....
शहरातील गणेशपार भागातील विद्युत डीपीच्या दुरवस्थेबाबत 'आम आदमी पार्टी'ने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन महावितरणकडून या डीपीची तात्काळ दुरुस्ती करण्यात आली असून, यामुळे गणेशपार परिसरातील वीज पुरवठा आता सुरळीत झाला आहे.
गणेशपार भागातील डीपीच्या देखभालीकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, आम आदमी पार्टीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष विजय जोशी यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. वारंवार वीज खंडित होत असल्याने येथील व्यापारी आणि नागरिक त्रस्त झाले होते. या संदर्भात लेखी निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त केला जात होता. मात्र, आंदोलनाच्या इशाऱ्याचे गांभीर्य ओळखून महावितरणच्या पथकाने तत्परतेने या डीपीचे मेंटेनन्स आणि दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. यामुळे संभाव्य आंदोलन तूर्तास टळले असून, महावितरणने वेळेत दखल घेतल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. लोकशाही मार्गाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जनतेचा प्रश्न सुटल्याची भावना विजय जोशी यांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे.गणेशपार व भीमनगर भागातील डीपी चा मेंटेनन्स झाला नसल्याने व्होल्टेज कमी जास्त होत असे व सतत वीजपुरवठा खंडित होत होता. मागील दोन दिवसात भीमनगर व आज गणेशपार डीपी चे लग्स, पीजी कॅलम्प, केबल, किटकॅट बॉक्स मेंटेनन्स पूर्ण करण्यात आले आहे. य उप कार्यकारी अभियंता अभिजित राठोड यांनी दखल घेऊन हा प्रश्न सोडवला तसेच वायरमन महेश मुंडे, मनोहर मुंडे व दिपक गुट्टे व सहकाऱ्यांनी दोन्ही डीपी चे मेंटेनन्स पूर्ण करून दिल्याबद्दल आम आदमी पार्टी च्या वतीने विजय जोशी यांनी आभार व्यक्त केले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा