शिवभक्तांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ.धनंजय मुंडे यांचे आभार!!!!!
विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
धाराशिव, दि. १८ मे : भारत निवडणूक आयोगाने, ( उस्मानाबाद-लातूर-बीड )स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद द्वैवार्षिक निवडणूक-२०२६ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धाराशिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.
निवडणुकीची अधिसूचना २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून २०२६ आहे.
अर्जांची छाननी २ जून रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
मतदान १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी २२ जून २०२६ रोजी होईल.
निवडणूक प्रक्रिया २५ जून २०२६ रोजी पूर्ण करण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा