पोस्ट्स

मे १०, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा तिसऱ्या दिवशी लागला शोध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र,  या युवकाचा कोणताही पत्ता लागत नव्हता. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होते. अखेर आज सकाळी अकोला येथून बोलावलेल्या विशेष पथकाने  तलावातून या युवकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. तीन दिवसानंतर बेपत्ता युवकाचा शोध लागला आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्य...

तरुणी कडून झालेला अपमान सहन न झाल्याने जीवन संपवले...

इमेज
"हा माझा शेवटचा फोन आहे" असे वडिलांना म्हणत युवकाची गळफास लावून आत्महत्या परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... "हा माझा शेवटचा फोन आहे" वडिलांना असे म्हणत युवकाची गळफास लावून  आत्महत्या  केल्याची  एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.परळी तालुक्यातील मोहा येथे ही घटना घडली. एका तरुणीने भररस्त्यात जाहीरपणे थोबाडीत मारल्याने झालेल्या तीव्र अपमानामुळे या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्याच्या वडिलांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात आरोपी तरुणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेभाऊ रामभाऊ शिंदे (रा. मोहा) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा चंद्रहार राजेभाऊ शिंदे याला गावातीलच एका तरुणीने १३ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात सर्वांसमक्ष थोबाडीत मारले होते. या मारहाणीमुळे आणि झालेल्या जाहीर अपमानामुळे चंद्रहार अत्यंत नैराश्यात होता. हा मानसिक छळ सहन न झाल्याने त्याने १४ मे रोजी सायंकाळी आपल्या वडिलांना फोन ...

अभिष्टचिंतन लेख:::::::: हार्दिक शुभेच्छा!!!!!

इमेज
  रुग्णसेवेतून समाजसेवेचा वसा जपणारे व्यक्तिमत्त्व :डॉ. विवेक दंडे परळी वैजनाथ ही प्रभू श्री वैद्यनाथांच्या भक्तीने ओतप्रोत भरलेली नगरी जशी श्रद्धेचे केंद्र आहे, तशीच ती आरोग्यसेवेतील विश्वासाचेही प्रतीक बनली आहे. या विश्वासाला आपल्या सेवाभावी कार्यातून बळकटी देणारे नाव म्हणजे डॉ. विवेक दंडे. वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून ती समाजसेवेची पवित्र जबाबदारी आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून वेळोवेळी सिद्ध केले आहे. आज दि. १७ मे रोजी डॉ. विवेक दंडे यांचा वाढदिवस साजरा होत असून, त्यानिमित्त त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक  कार्याचा घेतलेला हा गौरवपूर्ण आढावा आहे. डॉ. विवेक दंडे यांना सेवाभावाची प्रेरणा त्यांच्या वडिलांकडूनच लाभली. स्वर्गीय डॉ. दिगंबर दंडे (दादा) हे परळीतील ज्येष्ठ, अनुभवी आणि अत्यंत आदरणीय डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आयुष्यभर रुग्णसेवेला माणुसकीची जोड दिली. त्यांचा हाच आदर्श आणि संस्कार डॉ. विवेक दंडे यांनी आपल्या जीवनात आत्मसात केला. त्यामुळे आज त्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला केवळ औषधोपचारच नव्हे, तर आत्मीयतेचा आणि विश्वासाचा स...
इमेज
  20 मे रोजी देशभरातील मेडिकल स्टोअर्स राहणार बंद ? 12.4 लाख औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप परळी, प्रतिनिधी..  देशभरातील औषध विक्रेत्यांनी २० मे रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपात १२.४ लाखांहून अधिक औषध विक्रेते आणि औषध वितरक सहभागी होणारा असल्यामुळे परिणामी, २० मे रोजी देशाच्या अनेक भागांमध्ये औषधांची दुकाने बंद ठेवण्यात आली आहे हा संप ऑल इंडिया केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने (AIOCD) पुकारला असून ऑनलाइन फार्मसी प्लॅटफॉर्म आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या धोरणांमुळे पारंपरिक औषध व्यवसायावर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. लाखो औषध विक्रेत्यांची संपाची हाक ही ई-फार्मसीच्या वाढत्या आणि अनियंत्रित व्यवसायाचा निषेध करण्यासाठी 'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स' या संघटनेने २० मे रोजी देशव्यापी पुकारलेल्या संपात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. या दिवशी देशभरातील सर्व औषध दुकाने आणि वितरक आपली प्रतिष्ठाने बंद ठेवणार असून यामध्ये सुमारे १२.४ लाखांहून अधिक केमिस्ट आणि औषध वितरकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेने, ऑनलाइन फार्मसीच्या अनिय...

प्रमाणपत्र रोखण्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार जरांगेंचे टीकास्त्र...

इमेज
राज्यात मराठ्यांचा पुन्हा एल्गार: मनोज जरांगेचे 30 मे पासून उपोषण मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे वादळ घोंगावणार असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाची वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप करत, जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आरक्षणाचा हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला पुन्हा एकदा एकवटण्याचे आवाहन केले आहे. प्रमुख मागण्याया आंदोलनामध्ये प्रामुख्याने खालील तीन मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या आहेत:कुणबी प्रमाणपत्र वाटप: मराठवाड्यातील मराठा समाजाला विनाविलंब कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्यात यावे.५८ लाख बांधवांना लाभ: ज्या ५८ लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना त्वरित प्रमाणपत्रे देण्यात यावीत.सातारा गॅझेटची अंमलबजावणी: ऐतिहासिक सातारा गॅझेटचा जीआर (शासकीय निर्णय) तातडीने लागू करावा. याव्यतिरिक्त, सध्या अस्तित्त्वात असलेली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून, मरा...

क्रीडाविषयक प्रोत्साहन.....

इमेज
  अंबाजोगाई क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सोहम गजाकोशचा दबदबा डॉ.अतुल शिंदे यांच्या हस्ते सोहमला आरसीबी खेळाडू देवदत्त पड्डिक्कल यांच्या सहीचा बॉल प्रदान अंबाजोगाई : (प्रतिनिधी)अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट टूर्नामेंटमध्ये युवा गोलंदाज सोहम गजाकोश याने आपल्या अचूक आणि धारदार गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण स्पर्धेत विशेष छाप पाडली. स्पर्धेदरम्यान प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवत सोहमने तब्बल 13 फलंदाजांना बाद केले आणि “बेस्ट बॉलर” किताबावर आपले नाव कोरले. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे मैदानावर उपस्थित क्रिकेटप्रेमींनी त्याचे जोरदार कौतुक केले. संपूर्ण स्पर्धेत सोहमने टाकलेल्या माऱ्यासमोर अनेक फलंदाज निष्प्रभ ठरले. योग्य टप्प्यावर गोलंदाजी, उत्कृष्ट लाईन-लेंथ आणि दबावाच्या क्षणी विकेट घेण्याची क्षमता यामुळे तो स्पर्धेतील सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. प्रत्येक सामन्यात त्याने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. या स्पर्धेसाठी “बेस्ट बॉलर” पारितोषिक देण्याची घोषणा सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ् डॉ. अतुल शिंदे यांनी केली होती. स्पर्धेच्...
इमेज
अंबाजोगाई बसस्थानकावर महिलेच्या पर्समधील सोन्याचे साडेचार लाखांचे दागिने लंपास अंबाजोगाई (प्रतिनिधी):-    सध्या उन्हाळी सुट्यांमुळे अंबाजोगाई बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे . बसस्थानकावरील याच प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या बॅगेतील ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी सदर महिलेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी वैजनाथ येथील रहिवासी मनिषा विनोद जगतकर (वय ५०) या बुधवारी सकाळी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी मुरुड (जि. लातूर) येथे जाण्यास निघाल्या होत्या. त्या परळीहून अंबाजोगाई बस स्थानकावर आल्या होत्या.  येथून पुढे जाण्यासाठी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई येथून मुरुड  जाणाऱ्या बसमध्ये बसल्या. बसमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे  जागा पकडण्यासाठी त्यांचे दीर आप्पाराव कांबळे यांनी दागिन्यांची बॅग कंडक्टरच्या सीटजवळ...

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

महाराष्ट्रातील ९.८६ कोटी मतदारांची पडताळणी होणार

इमेज
  मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेची घोषणा महाराष्ट्रातील ९.८६ कोटी मतदारांची पडताळणी होणार नवी दिल्ली,१४: भारतीय निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'विशेष संक्षिप्त पुनरीक्षण - तिसरा टप्पा' (SIR Phase-III) राबवण्याचे अधिकृत आदेश दिले आहेत. या महत्त्वाकांक्षी मोहिमेत महाराष्ट्राचा प्रामुख्याने समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख ६४ हजार ४१३ मतदारांच्या नोंदी अद्ययावत केल्या जाणार आहेत. चालू असलेल्या जनगणनेच्या 'हाऊस लिस्टिंग' प्रक्रियेचा विचार करून आयोगाने हे वेळापत्रक आखले असून, हवामानाची प्रतिकूलता लक्षात घेता केवळ हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख या भागांना या टप्प्यातून वगळण्यात आले आहे. महाराष्ट्रातील या मोहिमेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून एकूण ९७,९२४ बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांच्या ९६,९४९ बूथ लेव्हल एजंट्सची (BLA) मदत घेतली जाणार आहे. आयोगाच्या वेळापत्रकानुसार, २० जून ते २९ जून २०२६ या काळात अधिकार...
इमेज
छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य: नगर परिषदेकडून परळीत मराठा भवनसाठी 28 गुंठे जागा प्रदान ; आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते जागा हस्तांतरित ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       परळी वैजनाथ शहरात मराठा भवन उभे राहावे अशी गेल्या अनेक वर्षांपासून ची सकल मराठा समाजाची  मागणी होती. ना.पंकजाताई मुंडे व माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ नगरपरिषदे कडून मराठा भवनसाठी 28 गुंठे जागा देण्यात आली आहे. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत आज माजी मंत्री आ .धनंजय मुंडे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करत ही जागा मराठा भवनसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे.         वैद्यनाथ मंदिर परिसरात नंदागौळ रस्त्यावर वेताळ मंदिराच्या बाजूला असलेली 28 गुंठे जागा नगरपरिषदेकडून मराठा भवनसाठी नियोजित करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून परळी मध्ये मराठा भवन असावे अशी मराठा समाजाची आग्रही मागणी होती. आता मराठा भवनसाठी ही जागा हस्तांतरित करण्यात आली आहे.लवकरात लवकर सुसज्ज मराठा भवन उभे राहील अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी व्य...
इमेज
परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे अनोखे 'आपट्याचं सोनं' आंदोलन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "एक वर्ष सोनं खरेदी करू नका" असे जाहीर केल्याच्या निषेधार्थ, परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एक आगळेवेगळे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. "आपट्याचं सोनं, आमचा स्वाभिमान!" अशी घोषणा देत पक्षाचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुरुवार, दि. १४ मे रोजी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात एकत्र येत हे आंदोलन केले. आंदोलकांनी मोदी सरकारच्या आवाहनाचा निषेध करण्यासाठी एकमेकांना आपट्याची पाने (प्रतीकात्मक सोनं) देऊन आपला रोष व्यक्त केला. आमची संस्कृती, स्वाभिमान आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्ही हे आपट्याचे सोनं देऊन शेतकरी आणि कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. "आपल्याच सोनं देऊ, आंदोलनाला हातभार लावू" असे आवाहन करत स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प...
इमेज
  माजी आमदार अँड.विजय गव्हाणे यांची ‘महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती परभणी  ता.14 माजी आमदार श्री. विजय गव्हाणे यांची महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या  ‘महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.  या पत्रात महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत असल्याचे  नमूद करून पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी  सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा मला ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी  प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.श्री. विजय गव्हाणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आ...

संतापजनक घटना

इमेज
  साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना, संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीला आपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोल...
इमेज
प.पु. अमृताश्रम स्वामी यांची सदिच्छा भेट: जोशी परिवाराने घेतले आशिर्वाद  < amp-auto-ads type="adsense" data-ad-client="ca-pub-9098747875103891"> पाटोदा, प्रतिनिधी — ह.भ.प. आचार्य डॉ. अमृताश्रम स्वामी महाराज नवगण राजुरीकर यांनी बुधवार, १३ मे रोजी पत्रकार विजय जोशी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी जोशी परिवाराच्या वतीने महाराजांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वातावरण भक्तिमय झाले होते. उपस्थितांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले. समाजप्रबोधन, अध्यात्म आणि संस्कार यांवर महाराजांनी मार्गदर्शन करत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार छगन मुळे, नगरसेवक रामेश्वर गोरे, पत्रकार अमोल जोशी, हरिभाऊ राऊत, सतीश जाधव सर, योगेश पंडित, गणेश खंडागळे, सुरवसे महाराज, शेषराव नाईकणवरे, अमर बनकर यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.
इमेज
  परळीचे दिवंगत माजी नगराध्यक्ष जाबेर खाँ पठाण यांच्या कुटुंबीयांचे आ. धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळीचे माजी नगराध्यक्ष म. जाबेर खाँ पठाण यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले होते, आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील पठाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन पठाण कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी पक्षात एकत्रित राहून शहराच्या विकासासाठी केलेल्या विविध कामांना व आठवणींना उजाळा देत धनंजय मुंडे यांनी जाबेर खाँ यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहिली. s>  यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अय्युब भाई शेख, शकील कुरेशी यांसह आदी उपस्थित होते. परळी पंचायत समितीचे माजी उपसभापती माधवराव मुंडे यांचेही केले सांत्वन स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब, स्व. पंडित अण्णा मुंडे यांचे जुने सहकारी, परळी पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच टोकवाडी गावचे माजी सरपंच माधवराव मुंडे यांच्या पत्नी कै. द्वारकाबाई मुंडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले होते. धनंजय मुंडे यांनी टोकवाडी ...

काय आहे बोधचिन्हांचा अर्थ....

इमेज
  नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि  मान्यवरांच्या हस्ते अनावरण   मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह दे...

परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन.....

इमेज
  जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास 19 मेपर्यंत मुदतवाढ बीड | प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बीड यांच्या वतीने सन 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या वर्षांकरिता देण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत आता 19 मे 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्राप्त प्रस्तावांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अरविंद विद्यागर यांनी दिली. जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाच्या जिल्हा क्रीडा पुरस्कार नियम 2020 व 2022 नुसार हे पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये 01 गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, 01 पुरुष खेळाडू, 01 महिला खेळाडू आणि 01 दिव्यांग खेळाडू अशा एकूण चार पुरस्कारांचा समावेश आहे. सन 2020-21 पुरस्कारासाठी 1 जुलै 2020 ते 30 जून 2021, सन 2021-22 पुरस्कारासाठी 1 जुलै 2021 ते 30 जून 2022 आणि सन 2022-23 पुरस्कारासाठी 1 जुलै 20...
इमेज
 कु. हर्मिका जगतकर हिचे बारावी विज्ञान शाखेत घवघवीत यश; 76% गुणांसह उत्तीर्ण बीड | प्रतिनिधी पत्रकार बालाजी जगतकर यांची कन्या कु. हर्मिका बालाजी जगतकर हिने इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत 76 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बीड येथील श्री बंकट स्वामी विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या हर्मिकाने आपल्या मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही खासगी ट्युशनचा आधार न घेता तिने नियमित अभ्यास आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भविष्यात मोठ्या पदावर कार्य करण्याचा मानस व्यक्त करत हर्मिकाने त्या दृष्टीने आतापासूनच अभ्यासाला सुरुवात केली असल्याचे सांगितले. तिच्या या यशामुळे कुटुंबासह विद्यालयाचेही नाव उज्ज्वल झाले आहे. कु. हर्मिका जगतकर हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

दिवसातुन चार तास अभ्यास ...

इमेज
  कुठलीही शिकवणी न लावता आईच्या मोबाईलवर अभ्यास करत आयुष ने मिळवला परळी शहरातुन प्रथम क्रमांक  परळी (प्रतिनिधी)   युवा व किशोरवयीन मुलांच्या हाती मोबाईल आला की,रिल्स, इन्स्टाग्राम,फेसबुक असा सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेम हे नित्याचेच मोबाईलच्या ऑनलाईन तंत्रज्ञानाचा फक्त आपल्या अभ्यासासाठी उपयोग करत आईच्या मोबाईलवर दोन तास ऑनलाईन आणि शाळेतील शिकवणीचे योग्य नियोजन लावत इयत्ता दहावीच्या परिक्षेत परळी शहरातुन प्रथम येण्याचा मान गणेशपार भागातील चि.आयुष मोहन संघई या विद्यार्थ्याने मिळवत विद्यार्थ्यांनी मोबाईलचा पॉझिटिव्ह वापर कसा करावा याचा आदर्श घालुन दिला आहे.  परळी शहरातील गणेशपार भागात दिगंबर जैन मंदिर समोरील रहिवासी मोहनराव संघई यांना आयुष आणि आगम ही दोन मुले.मोठा मुलगा आयुष हा शहरातील फाउंडेशन स्कुलमध्ये शिक्षण घेत यावर्षी दहावीची परिक्षा दिली.दहावी म्हटले की महागडे आणि प्रत्येक विषयाचे वेगवेगळे क्लासेस लावण्याची स्पर्धा सर्वत्र असताना लहानपणापासुनच अभ्यासात मग्न असलेल्या आयुषने मला कुठलाही क्लास नको फक्त अभ्यासाचे रिव्हीजनसाठी एखादा ऑनलाईन क्लास हवा अशी इच्छा व्यक्त क...

अखंड शिवनाम सप्ताहात परमरहस्य पारायण सोहळ्यास प्रतिसाद ...

इमेज
श्री शनैश्वर जन्मोत्सव व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी श्री शनी मंदिरात रक्तदान शिबीर  परळी वैजनाथ दि.१२ (प्रतिनिधी)          श्री शनी मंदिरात रविवार (दि.१०) पासून श्री शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  या सप्ताहात गुरुवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरास सहभागी होवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.           बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी (दि.१४)  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व गुणवंत ...
इमेज
  परळीत महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीज खंडित; जनता त्रस्त, महादेव गंगणे पाटील यांचा तीव्र संताप परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरात महावितरणच्या (MSEDCL) अत्यंत ढिसाळ आणि भोंगळ कारभारामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून महावितरण प्रशासनाला थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दिवसातून अनेक वेळा तासनतास अघोषित वीज पुरवठा खंडित केला जात आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसांत वीज गुल होत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. वारंवार वीज जात असल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे धंदे कोलमडले असून आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अनेक भागांत उघड्या डीपी (DP) आणि लोंबकळणाऱ्या वीज तारा दुरुस्त करण्याकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात बोलताना शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील म्हणाले की, नागरिक जेव्हा तक्रारी घेऊन महावितरण...
इमेज
  परळीत १३ मे रोजी भव्य 'सामूहिक सुदर्शन होम' आणि सत्संगाचे आयोजन परळी वैजनाथ (प्रतिनिधी)आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आणि पूज्य श्री श्री रविशंकर जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार, दिनांक १३ मे २०२६ रोजी परळीत भव्य 'सामूहिक सुदर्शन होम'चे आयोजन करण्यात आले आहे. वैदिक धर्म संस्थानतर्फे देशभरात आयोजित केल्या जाणाऱ्या ७० सुदर्शन होमांचाच हा एक भाग आहे. सामूहिक सुदर्शन होम विधी बुधवार, दिनांक १३ मे २०२६ रोजी परळी वैजनाथ येथील 'श्री श्री ज्ञान मंदिर' (वैद्यनाथ मंदिर पूर्व दिशा, पार्किंग लॉटच्या मागे) येथे दुपारी ४:३० ते सायंकाळी ६:०० या वेळेत संपन्न होईल.  सुदर्शन होम हा नकारात्मक ऊर्जा आणि जीवनातील अडथळे दूर करणारा अत्यंत प्रभावी वैदिक विधी मानला जातो. या मुख्य विधीनंतर जाहीर सत्संग आणि महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहून भाविकांना संकल्प सोडता येणार आहे.कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी किंवा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविक https://Vdst.in/e/77115 या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.  ९८६०४७४८२१  ९८८१२७०२२१,...

या निर्णयाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

इमेज
  नीट २०२६ परीक्षा रद्द! पेपरफुटीच्या आरोपानंतर सीबीआय चौकशीचे आदेश आणि फेरपरीक्षेचा निर्णय        परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.         राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) १० मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकाचा संदर्भ देत, NEET (UG) २०२६ परीक्षेबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. परीक्षा रद्द का झाली? देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी यंदा ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा दिली होती, महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचे आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचे प्राथमिक तपासात...

जीवाची लाही लाही....

इमेज
  परळी शहरात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सियसवर उन्हाच्या तडाख्याने दुपारी रस्ते सामसूम; परळी शहरात सुर्य ओकत आहे आग !! परळी/संतोष जुजगर परळी वैजनाथ तालुक्यात सध्या लग्नसराई चालू आहे.लग्नसराईच्या दिवसांमध्ये उन्हाची तिव्रता अधिक वाढू लागली आहे.लग्न कार्यानिमित्ताने खरेदी साठी बाजारपेठेकडे ग्रामीण भागातील नागरिक धाव घेतांना दिसत आहे. लग्नाचे कपडे, किराणा, दाग-दागिने खरेदीवर विशेष जोर देतं आहे.त्यातच नागरिकांच्या जिवाची उन्हामुळे लाही-लाही होतं आहे.यामुळे उन्हापासुन घामाघूम झालेले नागरीक, महिला, वयोवृद्ध, व बच्चे कंपनी थोडासा उन्हापासुन दिलासा मिळावा यासाठी शहरातील शितपेय व ऊसाच्या रसावर ताव मारत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पारा प्रथमच 39 अंश सेल्सियसवर पोहोचला. उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारनंतर परळी शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.  लग्नसराई असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शहरात विविध लग्नसामग्री खरेदी साठी येतं आहे.लग्नसराई महिना असल्याने नागरिक लग्नसामग्रीसह उन्हापासुन बचावासाठी टोप्या, रुमाल आदी खरेदी करतं आहे.उन्हाची तिव्रता असल्यामुळे शहरातील विविध दुकानंदार उन्हाच्या ...

परळीत पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार

इमेज
प्रथमेश आणि प्रांजली भावंडांचे यश!  परळीत पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार   परळी/ प्रतिनिधी  परळी येथील फुले आंबेडकरी अभ्यासक इंजि. भगवान साकसमुद्रे यांचे पुतणे तथा बालासाहेब साकसमुद्रे यांची मुले प्रथमेश आणि प्रांजली यांनी एसएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. प्रांजली हिला 94.80 तर प्रथमेश याला 94.20 गूण मिळाले आहेत. या त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याचाच भाग म्हणून आज परळी पत्रकार बांधवांच्या वतीने साकसमुद्रे भावंडांचा सत्कार पुण्यनगरी कार्यालय परळी येथे करण्यात आला यावेळी दैनिक पुण्य नगरीचे तालुका प्रतिनिधी तथा अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे धनंजय अरबुने, दैनिक अतुल्य महाराष्ट्रचे संपादक नितीन ढाकणे, लक्ष्मण वैराळ सर, माहिती अधिकार कार्यकर्ते सम्राट गित्ते, आम्रपाली साकसमुद्रे,साक्षी साकसमुद्रे दिसत आहेत.
इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या