पोस्ट्स

मे १७, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पेठ बीड पोलिसांची मोठी कारवाई;

इमेज
  जनावरे चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड ३ लाख किमतीची स्कॉर्पिओ जप्त    बीड: पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागोबा गल्ली येथून स्कॉर्पिओ वाहनातून गोवंश जातीची जनावरे चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीला पोलिसांनी सिनेमॅटिक पाठलाग करून अत्यंत शिताफीने अटक केली आहे. दिनांक २३ मे २०२६ रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, पोलिसांनी या टोळीतील तीन अट्टल चोरांना जेरबंद केले असून गुन्ह्यात वापरलेले ३ लाख रुपये किमतीचे काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी ६ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी तात्काळ तपास चक्र फिरवली होती.   तपास पथकाने बीड शहरातील ४० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक संशयित काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आढळून आली, मात्र तिचा नंबर प्लेट स्पष्ट नव्हता. पोलिसांनी तब्बल १९० किलोमीटरपर्यंतचे कॅमेरे आणि टोल नाके तपासले, तेव्हा आरोपींनी वारंवार नंबर प्लेट बदलून प्रवास केल्याचे समोर आले. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत पोलीस पथक मालेगाव आणि त्यानंतर सिल्लोड येथे पोहोचले. तेथे पळून जाण्याच्या तयारीत अ...
इमेज
  वादळी वाऱ्यामुळे हाहाकार; फळबागा उद्ध्वस्त, वीज यंत्रणा कोलमडल्याने अनेक गावे अंधारात! केज: तालुक्यातील युसुफ वडगाव मंडळ आणि परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या तीव्र चक्रीवादळसदृश वाऱ्याने आणि अवकाळी पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे. ताशी १०० ते १२५ किलोमीटरच्या प्रचंड वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धनेगाव, नायगाव, सादोळा, भालगाव, बावची आणि युसुफवडगाव परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून मुख्य रस्त्यांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडल्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागा आणि इतर फळबागा जमिनीदोस्त झाल्या असून नागरिकांच्या घरांवरील पत्रे तसेच घरगुती व कृषी सोलर पॅनेल्स हवेत उडून गेले आहेत. काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांचे व शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या वादळाचा सर्वांत मोठा फटका परिसरातील सार्वजनिक वीज पुरवठा यंत्रणेला बसला असून संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. उच्चदाब वीजवाहिन्य...
इमेज
  बीड जिल्ह्यातील पाच अट्टल गुंडांवर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी बीड: बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी व वाळू माफियांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकाच दिवशी पाच सराईत गुंडांवर 'एमपीडीए' (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची धडक कारवाई करण्यात आली. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी २२ मे २०२६ रोजी आदेश पारित करून या पाचही जणांना छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते.   या कारवाईत केज येथील जुबरे ऊर्फ मारी फारोकी (१० गुन्हे), पेठ बीडचा मोमीन सलीम (६ गुन्हे) आणि नवगण राजुरी येथील तुकाराम लक्ष्मण पवार (८ गुन्हे) यांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले व कारागृहात रवाना केले. यातील एक आरोपी न्यायालयीन कोठडीत असून दुसऱ्या फरार आरोपीच्या पोलीस मागावर आहे.   या गुन्हेगारांवर मारहाण, खंडणी, प्राणघातक शस्त्र बाळगणे आणि अवैध दारू विक्रीसारखे गंभीर गुन्हे दाखल असून परिसरात ...
इमेज
अवकाळी पाऊस व वीज: झाड अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू  केज: तालुक्यातील सोनी जवळा येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस आणि वीज कोसळल्याच्या भीषण घटनेत दिगंबर भीमराव ससाणे (रा. सोनी जवळा, ता. केज) या ४५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.  शनिवारी, २३ मे रोजी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास युसुफ वडगाव मंडळात अचानक कडाक्याच्या वादळासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी शेतात काम करत असताना वादळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ससाणे यांनी एका मोठ्या आंब्याच्या झाडाचा आश्रय घेतला. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्याच आंब्याच्या झाडावर अचानक वीज कोसळली. विजेचा धक्का आणि वादळाचा प्रचंड वेग यामुळे हे झाड मुळासकट उखडले गेले. या झाडाखाली चिरडून ससाणे यांचा जागीच अंत झाला. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे सोनी जवळा गावावर शोककळा पसरली आहे. शनिवारी सायंकाळी आलेल्या या अनपेक्षित वादळाने युसुफ वडगाव परिसराला अक्षरशः झोडपून काढले असून सगळीकडे हाहाकार माजवला आहे. निसर्गाच्या या रौद्ररूपामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे...

कुटुंबाचा आधार गेला.... कुटुंबावर दुःखाचा डोंगर

इमेज
  गंगाखेड - परळी रस्त्यावर निळा फाट्याजवळ अपघात; ऑटोचालक युवक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      गंगाखेड ते परळी रस्त्यावरील निळा फाट्याजवळ असलेल्या जिनिंग नजीक ऑटोचा भीषण अपघात होऊन ऑटोचालक युवक ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात आज (दि.२३) रोजी सायंकाळी 6:45 च्या सुमारास घडला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार साळुंकवाडी ता. अंबाजोगाई येथील ऑटोचालक युवक परमेश्वर विठ्ठल कर्वे (वय 37) हे प्रवासी भाडे घेऊन गंगाखेडकडे गेले होते. गंगाखेडहुन परळी कडे परत येत असताना गंगाखेड -परळी रस्त्यावर निळा गावच्या फाट्यापासून काही अंतरावर या ऑटोची मोठ्या वाहनाला धडक झाली. या धडकेत ऑटो चे मोठे नुकसान झाले असून ऑटो चालक युवक परमेश्वर कर्वे गंभीर जखमी अवस्थेत घटनास्थळी पडला होता. अपघात स्थळावरून परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातात मृत्यू पावलेला ऑटो चालक युवक परमेश्वर कर्वे हा अतिशय सुस्वाभावी, मनमिळाऊ व सर्वपरिचित युवक होता. त्याच्या अपघाताची बातमी कळताच साळुंकवाडी व परळी परिसरात...
इमेज
  सराईत गुन्हेगारावर  एमपीडीए अंतर्गत कारवाई  केज :- केज येथील येथील सराईत गुन्हेगार जुबेर उर्फ मारी उर्फ पाप्या मुस्ताक फारोकी, वय (२९ वर्ष, रा. रोजा मोहल्ला, केज जि.बीड) याच्या विरुद्ध पोलिस प्रशासनाने संघटित गुन्हेगारी कायद्या अंतर्गत (एम पी डी ए ) अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी कारागृहात केली आहे. केज शहरातील जुबेर उर्फ मारी ऊर्फ पाप्या मुस्ताक फारुकी याच्यावर केज येथे घरात घुसुन मारहान करणे, हितसंबंधीत व्यक्तींना मारहाण करुन जबरीने पैसे काढुन घेणे, चोरी करणे, हत्याराने वार करुन जखमी करणे, दुखापत करणे, दगड विटाने मारुन जखमी करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, अवैध शस्त्र बाळगणे, मोटर सायकल चोरी इत्यादी अशा गंभीर स्वरूपाच्या दहा गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्या पैकी सहा गुन्हे हे न्यायालयात न्यायप्रविष्ठ असून चार गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील आणि केज तालुक्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीड जिल्ह्यातील गुंडगिरी, गुन्हेगारी तसेच वाळु माफीयांचे समुळ उ...

1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त

इमेज
  कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 14 गोवंशीय जनावरांची सुटका गेवराई पोलिसांची कारवाई; 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त गेवराई : प्रतिनिधी  आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश कत्तलीविरोधात गेवराई पोलिसांनी शनिवारी (दि.23) धडक कारवाई करत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 14 गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत अंदाजे 1 लाख 60 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील अवैध गोवंश कत्तलीस आळा घालण्यासाठी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेवराईचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. साठेनगर येथील सलमान मोहम्मद कुरेशी (वय 25) याने आपल्या ताब्यातील जागेत गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गेवराई पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. छाप्यात आरोपीच्या मालकीच्या जागेत लहान-मोठी 14 गोवंशीय जनावरे द...

एक एकर परिसरात बहरली बारा हजार झाडांची हिरवळ....

इमेज
दीपक देशमुख यांच्या संकल्पनेतून आठ महिन्यांत फुलले ‘ऑक्सिजन पार्क’; भर उन्हाळ्यातही हिरवागार कॅम्पस  परळी वैजनाथ, प्रतिनिधी :     आजच्या काळात वेगाने होणारी वृक्षतोड, वाढते प्रदूषण आणि बदलते हवामान ही गंभीर समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धनासाठी केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करणारे हात फार कमी दिसतात. परळी शहराचे माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथ देशमुख यांनी मात्र आपल्या कृतीतून एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.      महाविद्यालय परिसरात अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेले ‘ऑक्सिजन पार्क’ आज भर उन्हाळ्यातही हिरवागार आणि टवटवीत दिसत आहे. या पार्कमध्ये विविध प्रकारची झाडे लावण्यात आली असून त्यांची योग्य निगा राखल्यामुळे परिसराला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. कडक उन्हाळ्यातही या ठिकाणी गारवा आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळत असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. आज अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होत असताना, दीपक देशमुख यांचा हा उपक्रम पर्यावरण प्रेमींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भविष्यातील पिढ्यांना ...
इमेज
  महापारेषणमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने ८ लाखांची फसवणूक; जालना जिल्ह्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ : प्रतिनिधी.....       महापारेषण विभागात सहाय्यक अभियंता पदावर सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल ८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील दोघांविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.      तळेगाव (ता. परळी) येथील प्रतीप पांडुरंग मुंडे (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बी.ई. इलेक्ट्रिकलचे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख जालना येथील ऋषिकेश सुनील खराटे याच्याशी झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही दोघांमध्ये संपर्क होता. दरम्यान, ऋषिकेश याने महापारेषण विभागात ओळखीच्या माध्यमातून सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगत पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. फिर्यादीने २९ डिसेंबर २०२४ रोजी महापारेषण विभागाच्या सहाय्यक अभियंता पदासाठी परीक्षा दिल्यानंतर ऋषिकेश याने संपर्क साधला. त्याने इतर उमेदवारांकडून २५ लाख रुपये घेत असल्याचे सांगत, मैत्री असल्याने १५ लाखांत काम करून देण्याचे आश्वासन ...
इमेज
  खळबळजनक : नदीपात्रात आढळला महिलेचा सांगाडा             माजलगाव तालुक्यातील डुब्बा मांजरा गावालगत वाहणाऱ्या सिंदफणा नदीच्या पात्रात एका महिलेचा सांगाडा आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील काही नागरिक नदीकाठी सरपण गोळा करण्यासाठी गेले असता त्यांना झाडाझुडपांमध्ये मानवी सांगाड्यासारखी वस्तू दिसून आली. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तो मानवी सांगाडा असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून सांगाडा ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात सांगाड्यावर काळ्या रंगाचा ब्लाउज आढळून आल्याने तो महिलेचा असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मृतदेहाला सुमारे तीन ते चार महिने उलटले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. काही दिवसांपासून नदीतील पाण्याची पा...

राम कुलकर्णी – भाजपा प्रदेश प्रवक्ता यांचा विशेष लेख.....

इमेज
बोले तैसा चाले… कृतीतून संदेश देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; वंदे भारत रेल्वेने प्रवास       राजकारणात मोठमोठी भाषणे करणारे अनेक नेते दिसतात, पण स्वतःच्या आचरणातून संदेश देणारे नेते फार थोडे असतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ऊर्जा बचत, काटकसर आणि साधेपणाचा संदेश दिला. त्या आवाहनाला केवळ शब्दांत प्रतिसाद न देता कृतीतून उत्तर देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज चर्चेचा विषय ठरत आहेत. मुख्यमंत्री पद म्हणजे प्रचंड ताफा, विशेष विमान, मोठा दिमाख आणि प्रोटोकॉल अशी सर्वसामान्यांची कल्पना असते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वागण्यातून आणि प्रवासातून वेगळा आदर्श घालून दिला आहे. पुण्याहून बेंगळुरूला इंडिगोच्या सामान्य विमानाने प्रवास, मुंबई-पुणे मार्गावर वाहनाने प्रवास आणि मुंबईहून शिर्डीला वंदे भारत एक्सप्रेसने आगमन… हे केवळ प्रवासाचे माध्यम नाही, तर जनतेला दिलेला एक सामाजिक संदेश आहे. शिर्डी येथे आयोजित गोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले होते. मोठ्या पदावरील व्यक्तींसाठी चार्टर्ड फ्लाईट, हेलिकॉप्टर किंवा...
इमेज
परळीत जीवघेणा हल्ला; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात महिला किराणा दुकानदारावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.       पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरन्नुम बेगम इब्राहिम खान (वय ४०, रा. आझादनगर, परळी) यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १७ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास कुरेशी मशिदीजवळील त्यांच्या किराणा दुकानासमोर ही घटना घडली. यावेळी उमर मेहबूब शेख, अयान डिंगुल, मेहबूब मौला शेख, रफीक रजाक शेख, अशु(पुर्ण नाव माहीत नाही), अमन मेहबूब शेख, शाजेन नजीर शेख, आयान मेहबूब शेख या आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.  फिर्यादीच्या मुलीचा विनयभंग केला.तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुलगा व पतीला अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप तक्र...
इमेज
  "तु मेरे साथ शादी कर,वरना भगाके ले जाऊंगा" ;दबाव टाकत धमकी परळीत तरुणीचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल  परळी वैजनाथ,प्रतिनिधी....  "तु मेरे साथ शादी कर,वरना भगाके ले जाऊंगा" असा दबाव टाकत धमकी व विनयभंग केल्पयाप्ररकरणी गुन्हा दाखल झाला आहे. परळीशहरातील आपना चौक परिसरात एका १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ही व्यवसायाने घरकाम करत असून २२ मे रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी अम्रु शेख (रा. आपना चौक, रौफ कॉलनी, परळी) याने फिर्यादी तरुणीला अडवून “माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुला पळवून नेईन” अशी धमकी दिली. तसेच तिचा हात पकडून ओढत विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ व ७८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पो.ह. जाधव हे करीत आहेत.
इमेज
  केदारनाथाचे दर्शन घेत असतानाच वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या ३०१ कोटीच्या आराखड्यास मंजूरी ना. पंकजाताई मुंडे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई दि. २२ -- चार धाम यात्रेच्या दरम्यान केदारनाथाचे दर्शन घेत असतानाच परळीच्या श्रीक्षेत्र वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्राचा ३०१ कोटीचा आराखडा मंजूर केल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज वर्षा निवासस्थानी जावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील इतर देवस्थानाबरोबरच परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर तीर्थक्षेत्र विकासाच्या ३०१ कोटी रूपयांचा आराखडा मंजूर केला. बैठकीच्या दरम्यान ना. पंकजाताई मुंडे चार धाम यात्रेला गेल्या असल्याने उपस्थित राहू शकल्या नव्हत्या पण त्यांनी केदारनाथाला मनोभावे केलेली प्रार्थना फळास आली. मागील सरकारमध्ये मंत्री असताना वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली होती. चार धाम यात्रेत केदारनाथाचे दर्शन घेत असताना इकडे त्याच दिवशी मुख्यमं...

मुख्यमंत्र्यांचे मानले आभार....

इमेज
केदारनाथाचे दर्शन घेत असतानाच वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या ३०१ कोटीच्या आराखड्यास मंजूरी ना. पंकजाताई मुंडे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई दि. २२ -- चार धाम यात्रेच्या दरम्यान केदारनाथाचे दर्शन घेत असतानाच परळीच्या श्रीक्षेत्र वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्राचा ३०१ कोटीचा आराखडा मंजूर केल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज वर्षा निवासस्थानी जावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील इतर देवस्थानाबरोबरच परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर तीर्थक्षेत्र विकासाच्या ३०१ कोटी रूपयांचा आराखडा मंजूर केला. बैठकीच्या दरम्यान ना. पंकजाताई मुंडे चार धाम यात्रेला गेल्या असल्याने उपस्थित राहू शकल्या नव्हत्या पण त्यांनी केदारनाथाला मनोभावे केलेली प्रार्थना फळास आली. मागील  सरकारमध्ये मंत्री असताना वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली होती. चार धाम यात्रेत केदारनाथाचे दर्शन घेत असताना इकडे त्याच दिवशी मुख्यमंत्...
इमेज
सिरसाळा - सोनपेठ रस्त्यावर बोअरवेलचा ट्रॅक्टर पलटी :चालक जागीच ठार तर सहकारी गंभीर जखमी परळी वैजनाथ: प्रतिनिधी....        सिरसाळा - सोनपेठ रस्त्यावर चालते ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्याने चालक जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक २२ मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली आहे.          एमएच २२ एएम १४६८ असे त्या बोअरींग ट्रॅक्टर चा क्रमांक आहे.  सिरसाळ्या कडून सोनपेठ च्या दिशेने  ट्रॅक्टर जात होते. सुसाट वेगात असलेल्या ट्रॅक्टर चालकाचा अचानक ताबा  सुटला व ट्रॅक्टर जागीच पलटी झाले.  पलटी होताच चालक ट्रॅक्टर खाली सापडला व त्याचा चिराडा होऊन तो जागीच ठार झाला.  त्याचा  सहकारी गंभीर जखमी झाला आहे. दोघेही परराज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी तात्काळ पोलीस प्रशासन दाखल झाले. पोलिस नोंदीची प्रक्रिया सुरु आहे.
इमेज
विहिरीमध्ये आडवे बोर घेताना दोन मजुरांचा मृत्यू; एक जखमी माजलगाव - तालुक्यातील खरात आडगाव येथील जय महेश शुगर इंडस्ट्रीजच्या विहिरीचे काम सुरू असताना झालेल्या  अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जय महेश शुगर इंडस्ट्रीजच्या विहिरीमध्ये आडवे बोर घेण्यासाठी बोरिंग मशीन आणण्यात आली होती. बोरिंग मशीनच्या झुल्याचे काम सुरू असताना अचानक झुला तुटून थेट विहिरीमध्ये कोसळला. या दुर्घटनेत जशवंत मीना (वय 26, रा. चित्ताखेडी, मध्यप्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच आणखी एका मजुराचाही मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप समजू शकलेली नाही. या अपघातात रविराज सिंग (वय 18, रा. मंदसोर, मध्यप्रदेश) हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, एका मजुराचा मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून दुसऱ्या मजुराचा मृतदेह विहिरीमध्ये अडकला असल्याने शोधकार्य सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
इमेज
परळीत मध्यरात्री हॉटेल चालकाची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या परळी वैजनाथ: पुढारी वृत्तसेवा....         परळी वैजनाथ शहरात पैशांच्या किरकोळ वादातून एका हॉटेल चालकाची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारभारी नारायण आंधळे असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास ताब्यात घेण्यात आले आहे.       मयत कारभारी आंधळे हे परळीत पवन हॉटेल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. २१ मे रोजी रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर कारभारी आंधळे हे संशयित आरोपी सचिन सोमनाथ राठोड आणि सुमीत पवार यांच्यासोबत दारू पीत बसले होते. दारू पित असतानाच त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून अचानक वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. संशयित आरोपी सचिन राठोड याने कारभारी आंधळे यांना घट्ट पकडून ठेवले, तर सुमीत पवार याने आपल्या जवळील धारदार चाकूने कारभारी यांच्या मानेवर आणि हातावर सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कारभारी...
इमेज
धारूर घाटात ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; तरुण गंभीर जखमी धारुर: अपघातासाठी कुप्रसिद्ध झालेल्या धारूर घाटात आज गुरुवारी (दि.२१) रात्री आणखी एक अपघात झाला. ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हनुमंत दराडे (रा. गावंदरा, ता. धारूर) असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिलीं.  अपघातातील धडक इतकी भीषण होती की, हनुमंत दराडे यांच्या गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 
इमेज
  तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनानंतर सरकारचा मोठा निर्णय; पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी जाहीर! बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनानंतर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. राकेश गिड्डे यांच्या निधनाला अवघा दीड महिना झाला असतानाच, सरकारने त्यांच्या पत्नी नेहा गिड्डे यांना अनुकंपा तत्त्वावर तातडीने शासकीय सेवेत नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून हा निर्णय घेतला. सांगलीत मिळणार नियुक्ती पतीच्या निधनानंतर नेहा गिड्डे यांनी बीडऐवजी सांगली येथे नोकरी मिळावी अशी विनंती प्रशासनाकडे केली होती. सरकारने त्यांची ही विनंती विशेष बाब म्हणून मान्य केली असून, त्यांना सांगली जिल्ह्यात शासकीय सेवेत समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्र पुणे विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. रेणापूर फाट्याजवळ झाला होता भीषण अपघात ९ एप्रिल रोजी सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या कारला भीषण अपघात झाला ह...
इमेज
समीर शेख यांची बीड जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती   बीड — समीर शेख यांची बीड जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य नियंत्रण कक्षातून त्यांची बीडला बदली करण्यात आली असून त्यांनी सचिन पांडकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पदभार स्वीकारणार आहेत. पोलीस दलाचा आश्वासक चेहरा म्हणून ओळख असलेल्या सचिन पांडकर यांची जवळपास साडेतीन वर्षानंतर धाराशिव येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे. सचिन पांडकर यांच्या कार्यकाळात अनेक आव्हानात्मक प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. असे असले तरी प्रत्येक वेळी त्यांनी पोलीस दल व जनता यांचा समन्वय साधून कामकाज केले. बीडच्या इतिहासात इतका कर्तव्यदक्ष अधिकारी लाभला नव्हता. आंदोलन काळात बीडमध्ये झालेली जाळपोळ असो की संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण झाल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती कुशलतेने त्यांनी हाताळली. पोलीस दलातला वरिष्ठ अधिकारी असताना देखील त्यांच्याकडे आपली कैफियत घेऊन येणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करत होते. परिणामी पोलीस दलाची प्रतिमा टिकून राहण्यात त्यांचं मोलाचं य...

मोहा येथील घटनेने बीडमध्ये हळहळ

इमेज
  बांधकामावरून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू बीड प्रतिनिधी —        मोहा ता. परळी येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून खाली पडल्याने एका २८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमोल विलास माने (वय २८, रा. गोविंद नगर, धानोरा रोड, बीड) असे मृत युवकाचे नाव आहे.या दुर्दैवी घटनेची सिरसाळा पोलीस ठाण्यात  बीएनएसएसच्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्युची नोंद करण्यात आली असुन पोलीस हवालदार विष्णु नामदेव शेंडगे अधिक तपास करत आहेत .     याबाबत मयताची आई निर्मला विलास माने यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ मे २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कंत्राटदार मुस्ताक कादरी व कामगार अक्षय गायकवाड आणि शेख अजीन हे त्यांच्या घरी आले. त्यांनी अमोल हा मोहा येथील बांधकाम साईटवर काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली पडल्याचे सांगितले. त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने शासकीय रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र नंतर नाते...
इमेज
  रंगकर्मी प्रदीप भोकरे यांना स्मृतिशेष विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्कार प्रदान परळी प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, महानगर शाखा लातूर यांच्या वतीने दिले जाणारे विविध पुरस्कार काल दिमाखदार वातावरणात वितरीत करण्यात आले. रंगभूमी, अभिनय आणि नाट्य चळवळीतील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत हा सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात स्मृतिशेष विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्कार रंगकर्मी श्री. प्रदीप भोकरे यांना, स्मृतिशेष बंकटराव पुरी पुरस्कार श्री. संकर्षण कऱ्हाडे यांना तर रंगमंचीय कार्यगौरव पुरस्कार सौ. नीलम शिर्के-सामंत यांना प्रसिद्ध अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. परळी सिने-नाट्य कलावंत संघटनेचे अध्यक्ष असलेले रंगकर्मी प्रदीप भोकरे हे सातत्याने रंगभूमीवर सक्रिय असून त्यांनी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा, बाल नाट्य तसेच कामगार कल्याण नाट्य स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि रंगतंत्रज्ञ या विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना स्मृतिशेष विजयकुमार धायगुडे रंगकर...

शासनाकडून हरकती व सूचना मागवल्या...

इमेज
छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये देवस्थान इनाम जमिनींसंदर्भात याआधीच कायदे अस्तित्वात! देवस्थान इनाम जमिनींबाबत नवीन कायदा लागू होणार   मुंबई: प्रतिनिधी..... राज्यातील देवस्थान इनाम जमिनींशी संबंधित गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि नागरिकांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६' चे प्रारूप (Draft) महसूल व वन विभागाकडून तयार करण्यात आले असून, यावर नागरिकांकडून ५ जून २०२६ पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. नवीन कायद्याची गरज का? सध्या राज्यात केवळ छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये देवस्थान इनाम जमिनींसंदर्भात 'हैदराबाद इनामे व रोख अनुदाने नाहीसे करण्याबाबतचा अधिनियम, १९५४' आणि 'हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम, १९५२' हे कायदे अस्तित्वात आहेत. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात असा कोणताही स्वतंत्र कायदा नसल्याने देवस्थान आणि नागरिकांना विविध कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गुंतागुंत सोडवून इतर जमिनींप्रमाणेच या जमिनींबाबतही नागरिकांना कायदेशीर हक्क देण्याचा शासनाचा विचार आहे. सूचना...

विशेष लेख >>>>प्रवीण टाके (उपसंचालक, (माहिती)विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर)

इमेज
  चला ! देशापुढे महाराष्ट्राच्या बचतीचा आदर्श ठेवूया !       ज्या ज्या वेळी देशावर संकट येते, त्या त्या वेळी महाराष्ट्र हा दिल्लीच्या मदतीला धावून जातो. “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला ” ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासूनची आपली भूमिका आजही तितकीच जिवंत आहे. युद्ध असो, टंचाई असो, महापूर असो की महामारी-महाराष्ट्राने प्रत्येक संकटात देशाच्या पाठीशी उभे राहत मदतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. पश्चिम आशियातील वाढते तणाव आणि त्यातून निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज देश पुन्हा एका मोठ्या आव्हानासमोर उभा आहे. या संकटाचा कालावधी किती असेल हे आपल्या हातात नसले, तरी या अशा काळात संयम, शिस्त आणि बचत यामधून देशाच्या अर्थकारणाला बळ देण्याचे मोठे काम महाराष्ट्र करु शकतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सर्वप्रथम आवाहन केले. त्यांनी देशवासियांना केलेले आवाहन हे केवळ खर्च कमी करण्याचे नाही, तर राष्ट्रहितासाठी जीवनशैली बदलण्याचे आहे. 'जितकी बचत, तितकी राष्ट्रसेवा' हा संदेश त्यांनी अत्यंत स्पष्टपणे दिला आहे. अनावश्यक ...

आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा रंगणार जल्लोष...

इमेज
  सिरसाळा येथे बुद्धरूप अनावरण व बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन ना. संजय शिरसाट,ना. पंकजाताई मुंडे, माजी मंत्री  आ.धनंजय मुंडे व डॉ. हर्षवर्धन कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम परळी प्रतिनिधी - परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रविवार दि. २४ मे २०२६ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्धरूपाचे अनावरण तसेच सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या लोकार्पणाचा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवानिमित्त परिसरात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले असून पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. सम्राट अशोक बुद्ध विहार, कुशी नगर, सिरसाळा येथे होणाऱ्या या कार्यक्रमास विविध मान्यवर, भन्तेजी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आयोजकांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून होणार असून पूज्य भन्ते डॉ. धम्मप्रिय महास्थवीर (अध्यक्ष, भीम जन्मभूमी महू, मध्यप्रदेश) यांच्या हस्ते हा विधी पार पडणा...
इमेज
 डॉ. श्रीगणेश मुंडे यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव परळी प्रतिनिधी: परळी वैजनाथ येथील मूळ रहिवासी तथा महानिर्मिती कंपनीमध्ये कार्यरत असलेले डॉ. श्रीगणेश महादेव मुंडे यांना प्रशासकीय कार्य, मानव संसाधन व्यवस्थापन, सुनियोजन आणि सामाजिक बांधिलकीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून गौरविण्यात आले आहे. आयएफईए संस्थेच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय व मानव संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच ग्लोबल एक्सेललेन्स समिट २०२६ तर्फे त्यांच्या विशेष कार्याबद्दल अभिनंदन पत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या सर्वांगीण कार्याची दखल घेत अमेरिकन मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने त्यांना मानद पीएच.डी. पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. डॉ. श्रीगणेश मुंडे यांनी D. Pharm, B. Pharm, MBA (HR) तसेच YCMOU अंतर्गत PhD Scholar म्हणून शिक्षण घेतले आहे. सध्या महानिर्मिती कंपनीच्या मुख्यालय मुंबई येथे मुख्य लिपिक म्हणून ते कार्यरत असून यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद जालना येथे औषध निर्माण अधिकारी तसेच परळी वैजनाथ थर्मल विद्...